Tarun Bharat

एकमेव पॅसेंजरही रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय

म्हैसूर एक्स्प्रेस 6 दिवस रद्द : लोंढा-मिरज दरम्यान कायमस्वरूपी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव ते शेडबाळ या दरम्यान धावणारी एकमेव पॅसेंजरदेखील सहा दिवस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एक्स्प्रेस केवळ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबत असल्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा बसचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लोंढा ते मिरज या दरम्यान कायमस्वरूपी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

बेळगाव ते सुलधाळ या दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम केले जात असल्यामुळे बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर गुरुवार दि. 3 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली होती. एकीकडे इतर सर्व ठिकाणच्या पॅसेंजर धावत असताना दुसरीकडे मात्र बेळगावमधून पॅसेंजर सुरू करण्यास नैर्त्रुत्य रेल्वेची उदासीनता दिसत आहे. एकमेव सुरू असणारी शेडबाळ पॅसेंजरदेखील सहा दिवस रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

एक्स्प्रेस रेल्वे घटप्रभा, गोकाक, कुडची आणि रायबाग अशा महत्त्वाच्या स्थानकांवरच थांबतात. तसेच एक्स्प्रेससाठी एक दिवस आधी तिकीट बुकिंग करावे लागते. पॅसेंजरने प्रवास करणाऱयांना स्थानकात उपलब्ध असणाऱया तिकीट काऊंटरवर तिकीट मिळते. पॅसेंजर नसल्यामुळे प्रवाशांना अधिक पैसे खर्च करत बसने प्रवास करावा लागत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसोबतच नोकरदार, व्यावसायिकांना बसत आहे.

म्हैसूर-बेळगाव रेल्वे पाच दिवस रद्द

म्हैसूर-बेळगाव-म्हैसूर विश्वकर्मा एक्स्प्रेस पाच दिवस रद्द करण्यात आली आहे. सावनूर ते करजगी या दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जात असल्याने काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. म्हैसूर-बेळगाव रेल्वे 7 मार्चपर्यंत तर बेळगाव-म्हैसूर रेल्वे 8 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे.

दुरुस्तीमुळे दुसरे-तिसरे रेल्वेगेट राहणार बंद

रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व दुरुस्तीच्या कारणास्तव दुसरे व तिसरे रेल्वेगेट बंद ठेवले जाणार आहे. दुसरे रेल्वेगेट गुरुवार दि. 3 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत बंद ठेवले जाणार आहे तर तिसरे रेल्वेगेट शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत बंद ठेवले जाणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे. 

Related Stories

हजारोंच्या उपस्थितीत सीमोल्लंघन

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यातील टॅगिंगला सुरुवात

Patil_p

अखेर कचेरी रोडचे भाग्य उजळले

Amit Kulkarni

दुसरे रेल्वेगेट खुले न झाल्याने वाहतुकीची कोंडी

Amit Kulkarni

डॉ.शोभा नाईक यांचा एसकेई सोसायटीतर्फे गौरव

Patil_p

संगमेश बिराजदारकडून प्रदीप ठाकुर चीत

Amit Kulkarni