Tarun Bharat

एकरकमी फायनल, आता प्लस किती?

-शेतकरी संघटनांच्या परिषदांकडे शेतकऱ्यांच्या नजरा

विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर

कागलच्या शाहू साखर कारखान्याने एकरकमी एफआरपीची कोंडी फोडल्यानंतर राज्यातील सर्व कारखानदारांनी शाहूच्या पावलावर पाऊल ठेवत तुर्तास शेतकऱयांना  दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वाढलेला उत्पादन खर्च राष्ट्रीय आंतरराष्ट्री बाजारात साखरेला असलेली चांगली मागणी याचे गणित शेतकरी संघटनांच्या ऊस परिषदांतून मांडले जाणार आहे. रयत क्रांती संघटनेने अधिक तीनशेची मागणी केली आहेच, आता स्वाभिमानीच्या ऊस परिषदेतही वाढीव मागणी होऊ शकते. तथापि आजपर्यंतच्या ऊस परिषदांमध्ये केलेली मागणी प्रत्यक्षात उतरलेली नाही. कारखानदारांच्या भूमिकेमुळे यंदा एकरकमी एफआरपी मिळणार आहेचे पण शेतकरी संघटनांच्या विचार परिषदांमधून निदान यंदातरी अधिकचे काहीतरी पदरात पडणार का याकडे शेतकऱयांच्या नजरा लागलेल्या आहेत. यासाठी शेतकरी नेत्यांनी ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

शेतकरी संघटनांच्या परिषदांतून जागर

राज्यात लहान मोठÎा अनेक शेतकरी संघटना आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रभावी मानली जाते. त्यामुळे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे शेतकऱयांसह कारखानादारांचे लक्ष लागलेल असते. या परिषदेत यंदा काय दर मागितला जातो याकडे शेतकऱयांचे कान टवकारलेले असतात. दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे वातावरण निर्मिती करता आली नाही. आता कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने ऊस परिषदा खुल्या मैदानात होत आहेत. जयशिवराय किसान संघनटेचा पेठवडगांव येथे नुकताच मेळावा पार पडला या मेळाव्यात संस्थापक शिवाजीराव माने यांनी थकित एफआरपीवरील व्याजाची मागणी केली. तर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी एफआरपी एकरकमी मिळणार आहेच आता बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. 3600 पर्यंत साखर विकली जात आहे. त्यामुळे एफआरपी अधिक तीनशे रुपये कारखानदारांनी द्यायला पाहिजेत. अशी भूमिका मांडली. तर पुढील महिन्यात शेतकऱयांच्या प्रश्नाव किसान परिषद होत आहे. याच दरम्यान आंदोलन अंकुशने एल्गार परिषद आयोजीत केली आहे.   माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीची मंगळवारी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह पटांगणावर 20 वी ऊस परिषद होणार आहे. तत्पूर्वी शेट्टी यांनी 12 जिल्हÎातून `जागर एफआरपीचा आराधना शक्तीपिठांची’ यात्रा काढली, एकरकमी एफआरपीबाबत शेतकऱयांमध्ये जागृती केली. मात्र आता एकरकमीचा तिढा सुटलेला आहे, त्यामुळे मंगळवारच्या ऊस परिषदेत शेट्टी कोणता नवा मुद्दा उपस्थित करताता याकडे शेतकऱयांपेक्षा कारखानदारांचेच अधिक लक्ष आहे.

चर्चा करा पण पदारात पाडून घ्या

अन्य शेतकरी संघटनांनी अधिकची मागणी केली असली तरी स्वाभिमानीच्या मागणी विशेष महत्व आहे. त्यामुळे एफआरपी अधिक काहीती मागितले पाहिजे अशी चर्चा स्वाभिमानीच्या गोठात सुरु आहे. ऊस परिषदेच्या व्यासपीठावरुन तशी मागणी होईलही पण मागे वळून पहाताना आतापर्यंत केलेल्या मागण्या कितपत सत्यात उतरल्या हे ही पहाणे यानिमित्ताने महत्वाचे आहे. एका बाजुला मागणी करायची आणि दुसऱया बाजुला चर्चेचा ही पर्याय ठेवायचा अलिकडच्या काही वर्षात एक-दोन कारखाने वगळता एफआरपी अधिकचे शेतकऱयांना काहीच मिळालेले नाही. हे वास्तव आहे. कोणताही प्रश्न चर्चेतून सोडवावा लागतो. मात्र ज्या पातळीर चर्चेतून मार्ग निघतो ते पदरात पाडून घेण्यासाठी पुढे जे काही रेटावे लागते तसे होताना दिसत नाही. सोयस्करपणे दुर्लक्ष केल्याने शेतकऱयांच्या पदरात फक्त एफआरपीवरच समाधान मानावे लागते. शेतकऱयांच अधिकचे समाधान करायचे असल्यास शेतकरी नेत्यांनी गंभीर झालं पाहिजे, शेतकरी चळवळीला आता ठाम भूमिकेचीच गरज आहे.

Related Stories

पाच वर्षांपूर्वी आजीला भिंतीत पुरले; आरोपी नातवाला कोल्हापुरात अटक

Archana Banage

रेल्वेमध्ये बनावट नियुक्तीपत्र देऊन १० लाख ५० हजाराची फसवणूक, गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापूर : राज्यात प्रथमच ४२५ किलो सिलेंडरचे लॉन्चिंग…

Archana Banage

कोडोलीतील तीन चोरटे गजाआड, सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

Kolhapur; जिल्हा परिषदेच्या ‘आरोग्य’ विभागात लाचखोरीचा ‘कळस’

Abhijeet Khandekar

सर्वसामान्यांच्या घर बांधकामाला महागाईचा फटका

Archana Banage