Tarun Bharat

एकही बालक पोलिओ लसीपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

प्रतिनिधी / सातारा :

      जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार राज्यात 1995 पासून, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात एक ही बालक लसीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.

         त्यानुसार दि. 19 जानेवारी 2020 रोजी सर्व भारतात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र नागठाणे (ता. जि. सातारा) येथे पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोहिते, प्रांताअधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर, तहसीलदार आशा होळकर यांची उपस्थिती होती.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये तर जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी आभार मानले.

Related Stories

कोरोनाचे नियम मोडणाऱयांकडून 11 लाखांचा दंड वसूल

Patil_p

आंब्याचा भरधाव टेम्पो उलटला

Patil_p

सातारा : सोनगाव कचरा डेपोत ओल्यासुक्या कचऱ्याची दहीमिसळ

Archana Banage

बाळू खंदारे-सनी भोसले राडा प्रकरण : दोन पथके रवाना तरी ‘बाळू’ सापडेना

Archana Banage

शस्त्राचा धाक धाकवून पोकलेन चालकाला लुटले

Patil_p

सातारा : …अखेर बावधनचं बगाड निघालं

datta jadhav