Tarun Bharat

एकाचे आत्मसमर्पण दुसऱ्याला कंठस्नान

Advertisements

दहशतवादविरोधी मोहीमेत सैन्याला मोठे यश

श्रीनगर / प्रतिनिधी

काश्मीरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला मंगळवारी मोठे यश मिळाले. पाकिस्तानकडून घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांचा कट सैन्याने हाणून पाडला असून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तसेच अन्य एकाचा खात्मा करण्यात आला असून घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. शोधमोहीम आणि चकमकीदरम्यान अली बाबर नामक दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले असून अतीक नावाचा दहशतवादी ठार झाला.

सीमेलगतच्या भागांमध्ये होणाऱया घुसखोरीची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानुसार साधारण 18-19 सप्टेंबरपासून सैन्याने शोधमोहीम सुरू केली होती. मंगळवारी त्या मोहिमेला यश आले. गेल्या सात दिवसांत सैन्याने सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पण, या मोहिमेत अली बाबर नावाचा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जिवंत पकडण्यात सैन्याला यश आले.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या दिपलपुरचा रहिवासी असलेला अली बाबर फक्त सातव्या इयत्तेपर्यंत शिकला आहे. पण, कमी वयातच त्याने दहशतवादाचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 मध्ये त्याने खैबर पख्तनुवा येथे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले असून भारताच्या सीमेत त्याने घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यासोबत पाकिस्तानचा दहशतवादी अतीक उर रहमान देखील होता. त्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.

Related Stories

पश्चिम बंगालच्या विद्यापीठात तोडफोड

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाकडून वसीम रिझवीला जामीन

Patil_p

देशात 24 दिवसांमध्ये 30 ते 40 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Rohan_P

बिगूल वाजणार !

Patil_p

केरळमध्ये पीएफआय बंदला हिंसक वळण

Patil_p

‘नकारात्मक’ नव्हे ‘स्थिर’

Patil_p
error: Content is protected !!