Tarun Bharat

एकाच अपार्टमेंटमधील 103 जण कोरोनाबाधित

Advertisements

पार्टीमुळे कोरोनाचा फैलाव : 3 हजारहून अधिक जणांची कोविड चाचणी

प्रतिनिधी / बेंगळूर

बेंगळूरच्या बोम्मनहळ्ळी परिसरातील बिळेकहळ्ळी येथील अपार्टमेंटमध्ये 103 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे खळबळ उडाली असून बेंगळूर महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी बोम्मनहळ्ळी परिसरात मंगळवारी 3000 हून अधिक जणांची कोविड चाचणी केली आहे. पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांकडून कोरोनाचा फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोम्मनहळ्ळी परिसरातील बिळेकहळ्ळी येथील एसएनएन लेकव्हय़ू अपार्टमेंटमध्ये 103 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. येथील अपार्टमेंटमध्ये 475 फ्लॅट्स असून 2500 जण वास्तव्य करतात. येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या 3000 हून अधिक जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी येथील अपार्टमेंट 31 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची मंगळवारी कोविड चाचणी केल्यानंतर आणखी 70 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील अनेकजण 25 ते 35 वयोगटातील आहेत. त्या सर्वांना अपार्टमेंटमध्येच क्वारंटाईन करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. सदर अपार्टमेंट सीलडाऊन करण्यात आले आहे.

Related Stories

कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन इंजिनियरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या

Amit Kulkarni

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ३ दिवसांच्या दौऱ्यासाठी बेंगळूरात दाखल

Abhijeet Shinde

बेंगळूरहून म्हैसूरला जाताना कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र आवश्यक

Abhijeet Shinde

अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

Abhijeet Shinde

विजयनगरच्या प्रभारी अधिकारीपदी रजनीश गोयल यांची नेमणूक

Amit Kulkarni

कर्नाटकात आतापर्यंत २७ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!