Tarun Bharat

एकाच कुटुंबातील 3 मुलांना दुर्मीळ आनुवंशिक आजार

उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन

प्रतिनिधी / हुबळी

होसूर हुबळी येथील अश्विनी आणि विनायक कबाडी या दांपत्यासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. या दांपत्याला कुणाल आणि कार्तिक ही 12 वर्षीय जुळी मुले आहेत. हे दोघेही 4 वर्षांचे वाटतात, तसेच त्यांची मानसिक स्थिती अद्याप दीड वर्षाच्या बालकाप्रमाणे भासते. या दोघांना आणखी एक 8 वर्षीय गोविंद नावाचा भाऊ आहे.

विनायक यांचे पानपट्टीचे दुकान असून कुटुंबात तेच एकमेव कमवते आहेत. या दांपत्याची तिन्ही मुले दुर्मीळ आनुवंशिक आजाराशी झगडत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये आमच्या मुलांना उपचारासाठी नेले आहे. परंतु प्रत्येक रुग्णालयात एमआयआर काढायला सांगण्यात येते आणि डॉक्टर तीच ती औषधे देतात, असे विनायक यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

स्टेरॉईडचा डोस दिल्यावर सर्वात लहान मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होते. उर्वरित दोन मुलांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा होताना दिसून येत नाही. या मुलांच्या उपचाराकरिता आतापर्यंत 20 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्ची घातली आहे. त्यांच्या उपचाराचा खर्च (मासिक 12 हजार रुपये) पेलणे आता दिवसेंदिवस कठीण होत चालले असून उत्पन्नही घटत असल्याची व्यथा विनायक यांनी मांडली आहे.

या कुटुंबाला उपचार प्रदान करण्यास फिलान्थ्रोपिस्टांनी मदत केली आहे. जर एखाद्या रुग्णालयाने किंवा उद्योगाने या मुलांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना वाचविता येणार आहे. अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क साधला, यातील काही जणांनी आम्ही त्यांच्या मतदारसंघातील नसल्याचे कारण दिले. इतरांनी आशा दाखविल्याच्या नावाखाली केवळ दिशाभूल केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा असलेल्यांनी 9980824336 किंवा 8453063337 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच अश्विनी यांच्या बँक ऑफ बडोदातील खाते क्रमांक 07790100029682 मध्ये रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाचे भविष्य अनिश्चित

सर्वात लहान मुलाचे भविष्य अनिश्चित असून तो मोठा होत असताना नियमित उपचार न केल्यास एका मागोमाग एक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी तिन्ही मुलांची जेनेटिक प्रोफायलिंग करण्यास सांगितले असून याकरता प्रत्येकी 36 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च आम्हाला झेपणारा नसल्याचे विनायक यांनी म्हटले आहे.

Related Stories

आज दहावी परीक्षेचा गणितचा पेपर

Patil_p

गावचा विरोध असूनही क्रीडांगण करण्याचा घाट

Amit Kulkarni

‘जोग’ गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगामचा विजेता

Amit Kulkarni

पिरनवाडीतील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

Amit Kulkarni

शेकडो सीमावासीय आंदोलनात सहभागी

Amit Kulkarni

भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाकडे पर्यटकांची पाठ

Amit Kulkarni