Tarun Bharat

एकाच फुटबॉल संघातील 25 जणांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / कीव : 

युक्रेनमध्ये क्रीडास्पर्धेदरम्यान एकाच फुटबॉल संघातील 25 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोनामुळे युक्रेनमध्ये मागील २ महिने क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. मागील आठवड्यात पुन्हा एक फुटबॉल लीग सुरु करण्यात आली. स्पर्धा रंगात आली असतानाच 65 खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकाच संघातील 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 

या बाधित खेळाडूंच्या संघाचा पहिला सामना काही कारणास्तव रद्द करण्यात आला होता. आता पुढील दोन सामने स्थगित करण्यात आल्याची माहिती युक्रेन महासंघाने दिली.

Related Stories

दोन विवाह करण्याची पुरुषांवर सक्ती

Patil_p

अमेरिका युनायटेड चषकाचा मानकरी

Patil_p

गलवान खोऱ्यात मारले गेलेल्या सैन्यांची चीनकडून कबुली

datta jadhav

ट्रम्पपुत्र संक्रमित

Patil_p

100 वर्षांची पॉवरलिफ्टर

Patil_p

वनडे मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा

Patil_p