ट्रकमालकांमध्ये खळबळ : होंडा, सोनशी, न्हावेली भागातील प्रकार


प्रतिनिधी /वाळपई
होंडा सोनशी नावेली आदी भागातील सुमारे पंधरा ट्रकांच्या बॅटऱया अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामुळे या भागामध्ये खळबळ माजली आहे. सबंधित चोरटय़ांचा तपास ताबडतोब करून त्यांना त्वरित गजाआड करण्याची मागणी ट्रक मालकांनी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सोमवारी रात्री सुमारे पंधरा ट्रकांचे दरवाजे उघडून आतील बॅटऱया गायब होण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. हे वृत्त परिसरात पसिरताच मंगळवारी सकाळी अनेकांनी आपापल्या ट्रकमधील बॅटरी आहे की नाही याची तपासणी केली. यामध्ये सुमारे पंधरा ट्रकांच्या बॅटऱया गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. यामध्ये होंडा सोनशी नावेली हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, या संदर्भात उद्योजक व ट्रक मालक प्रकाश गवस यांच्याशी संपर्क साधला असता, या तीनही भागातील मोठय़ा प्रमाणात बॅटऱया गायब होण्याचा प्रकार सोमवारी रात्री घडलेला आहे. यामुळे मालकांना बऱयाच प्रमाणात फटका बसला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बाजारपेठेत एका बॅटरीची किंमत 9 ते 10 हजार एवढी आहे. आधीच कर्जबाजारी झालेल्या ट्रक मालकांना हा फटका बसल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी आणखीच वाढल्या आहेत. काही ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आले होते तर अनेकांचे ट्रक गॅरेजमध्ये ठेवण्यात आले होते.
एका बाजूने गाडय़ा बंद असल्यामुळे बँकांमध्ये कर्जाचे हप्ते वाढू लागलेले आहेत .तर दुसऱया बाजूने काम नसल्यामुळे ट्रक मालकांची अवस्था गर्भगळीत झाली आहे . असे असताना ट्रकामधील बॅटरी अचानकपणे गायब होण्याचा प्रकार खरोखरच संतापजनक असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली. यामुळे वाळपईच्या पोलिस यंत्रणेने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन यामागे गुंतलेल्या संशयितांना ताबडतोब गजाआड करावे अशा प्रकारची मागणी केली आहे . दरम्यान अचानकपणे बँटऱया गायब होण्याच्या प्रकारामुळे खळबळ निर्माण झालेली आहे .
यामुळे अनेकांनी याबाबत सतर्कता राखून आपल्या ट्रकांमध्ये असलेल्या बॅटरी काढून घरांमध्ये ठेवण्यावर भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. काही ट्रक मालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना पोलिसांनी सोनशी नावेली होंडा आदी भागांमध्ये रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. तसे झाल्यास अशा प्रकारच्या चोऱयावर नियंत्रण येणार आहे. एकाच रात्रीत जवळपास पंधरा पेक्षा जास्त गाडय़ांचा बॅटऱया गायब करण्याच्या प्रकारामुळे आता ट्रक मालकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. कारण येणाऱया काळात अशा अवस्थेतून प्रकारचे टायर गायब होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही असे यावेळी ट्रक मालकांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केले.
स्थानिकांचा सहभाग असण्याची शक्यता.
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या प्रकारामध्ये स्थानिकांचा सहभाग असण्याची शक्मयता अनेक ट्रक मालकांनी व्यक्त केलेली आहे .कारण अनेक ट्रक गॅरेजमध्ये ठेवण्यात आले होते .तर काही ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आले होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गाडय़ांच्या बँटऱया गायब करण्याचा प्रकार हा धाडसी स्वरूपाचा आहे .यामुळे या प्रकारात स्थानिक नागरिकांचा सहभाग असण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे पोलिस यंत्रणेने याबाबत कसून चौकशी करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.