Tarun Bharat

एकाच वेळी नऊ महिलांशी विवाह

ही घटना ब्राझिलमधील आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पहिल्या पत्नीसह आणखी आठ महिलांशी विवाह केला. या व्यक्तीचे नाव आहे ऑर्थर ओ उसरो. उसरो हे मॉडेलिंगचा व्यवसाय करतात. ब्राझिलमध्ये एक पत्नीत्वाची पद्धत आहे. ही पद्धत आपल्याला मान्य नसून ती संपविण्यासाठी आपण एकाच वेळी नऊ विवाह केले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. ब्राझिलमधील पद्धतीनुसार आपण प्रथम एकाच महिलेशी विवाहबद्ध झालो होतो. पण आता ही पद्धती आपल्याला मान्य नसल्याने आणखी आठ महिलांबरोबर विवाह करत आहोत, असे स्पष्टीकरण उसरो यांनी दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी एकाच वेळी हे नऊ विवाह कॅथॉलिक चर्चमध्ये जाऊन तेथील रिवाजानुसार केले आहेत.

मात्र, त्यांच्या या कृतीमुळे कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्राझिलमध्ये एका व्यक्तीला त्याची एक पत्नी असताना दुसरा विवाह करता येत नाही. त्यामुळे त्यांनी केलेले हे आठ अतिरिक्त विवाह कितपत कायदेशीर आहेत? यासंबंधी चर्चा होत आहे. उसरो यांनी आपला पहिला विवाहही अनोख्या पद्धतीनेच केला होता. तसेच कोरोनाकाळात देशभर लॉकडाऊन असताना ते आपल्या पहिल्या पत्नीसह लोकांना ‘सेक्स टिप्स’ ऑनलाईन देत होते. त्यामुळे त्यांची देशभर प्रसिद्धी झाली होती. आता या बहुविवाह सोहळय़ानंतर ते पुन्हा सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांमधूनही राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहेत.

Related Stories

500 कोटी रुपयांचा विवाह

Patil_p

जगातील सर्वात श्रीमंत गाव

Patil_p

शुक्राणू दिल्यानंतर त्वरित पतीचा मृत्यू

Amit Kulkarni

रक्षाबंधननिमित्त ‘आयआरसीटीसी’कडून महिलांसाठी ‘ही’ खास ऑफर

Tousif Mujawar

दोनवेळा जन्मलेले मूल

Patil_p

पोलीस मित्रांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत

prashant_c