Tarun Bharat

एका कॉलवरुन ९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणाऱ्या भारतीय CEO ने मागितली माफी; म्हणाले…

ऑनलाईन टीम /तरुण भारत

अमेरिकेमधील न्यूयॉर्कमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तीन मिनिटांमध्ये ९०० जणांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा प्रकार समोर आला होता. बेटर डॉट कॉम नावाच्या कंपनीमधून ही कर्मचारी कपात करण्यात आले आहेत. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी मागील बुधवारी कर्मचाऱ्यांसोबत झूम कॉल केला होता. याच बैठकीत गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. विशाल गर्ग भारतीय वंशाचे असल्याने आपल्याकडेही या बातमीची चांगलीच चर्चा रंगली होती.

मात्र यानंतर विशाल गर्ग यांना टीकेचा सामना करावा लागला होता. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान यानंतर विशाल गर्ग यांनी माफी मागितली असून “माझ्या लक्षात आलं आहे की, ज्या पद्धतीने मी संवाद साधला त्यामुळे ही वाईट परिस्थिती अजूनच बिघडली”, असं विशाल गर्ग यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेसहीत जगभरामधील अनेक देशांमध्ये सुट्ट्यांचा कालावधी सुरु होतोय. त्यामुळे कंपनीने कॉस्ट कटिंगचा विचार करुन मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केली. कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे याची कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना देण्यात आली नव्हती.

Related Stories

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांपार

datta jadhav

36 केंद्रीय मंत्री भ्याड : मणिशंकर अय्यर

Patil_p

मुंबई महापालिकेची नवीन नियमावली जारी; लक्ष्मीपूजन वगळता मुंबईत फटाक्यांना बंदी

Tousif Mujawar

केरळ सरकारचे विधेयक घटनाविरोधी

Patil_p

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत’ मराठीचा बोलबाला;’गोष्ट एका पैठणीची’आणि राहुल देशपांडेंना पुरस्कार जाहीर

Abhijeet Khandekar

रुग्णांना बेड मिळावेत यासाठी कठोर कार्यपद्धती अवलंबणार : महापौर किशोरी पेडणेकर

Tousif Mujawar