Tarun Bharat

एका रोपावर 1200 हून अधिक टोमॅटो

Advertisements

विश्वविक्रमाची झाली नोंद

कोरोना काळात क्वारंटाइनयुक्त जीवनाने लोकांना बरेच काही शिकविले आहे. या काळात लोकांनी नवनवे उपक्रम राबविले, कुणी स्वयंपाक कसा करावा याचे धडे गिरविले, तर काही जणांनी वेगवेगळय़ा प्रकारचे छंद जोपासले. काहींनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला. परंतु एका व्यक्तीने केलेले काम पाहून जग हैराण आहे. ब्रिटनच्या डग्लस स्मिथला बागकामाचा छंद होता. या छंदाला त्याने क्वारंटाइन काळात नव्या स्तरावर नेले आहे.

स्मिथने नवीन वृक्षारोपण पद्धतींवर (इनोव्हेटिव्ह प्लँटेशन मेथड) काम केले आणि 2021 मये टोमॅटोचे एक असे रोप उगविले, ज्याद्वारे 839 टोमॅटो तयार झाले. परंतु काही महिन्यांमध्येच स्थिनने स्वतःचाच हा विक्रम मोडीत काढल आहे.

स्मिथने ग्रीन-हाउसमध्ये टोमॅटोच्या आणखीन एका रोपावरून 1269 टोमॅटो प्राप्त केल्यावर 9 मार्च रोजी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डृसने त्याला नवा विश्वविक्रम घोषित  केले आहे. हे टोमॅटोचे रोप 27 डिसेंबर 2021 रोजी पूर्णपणे मोठे झाले होते. परंतु विश्वविक्रमाच्या पडताळणीच्या प्रक्रियेला अनेक आठवडे लागले आहेत.

नवा विश्वविक्रम

स्मिथने स्वतःच्या या कामगिरीला ट्विटरद्वारे जगासोबत शेअर केले आहे. एक नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, एका रोपावर 1269 टोमॅटोंचे पीक घेण्याच्या माझ्या विक्रमाला मान्यता मिळाल्याची घोषणा करताना आनंद होतोय असे स्मिथने म्हटले आहे. सोशल मीडियावर लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जगभरात बागकामाची आवड असणाऱया लोकांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे ट्विटर युजरने म्हटले आहे.

Related Stories

गुलाबी रंगासोबत विवाहबद्द

Patil_p

कुत्र्याच्या दातांनी लावला पाच लाख रुपयांचा चुना

Patil_p

रक्षाबंधननिमित्त ‘आयआरसीटीसी’कडून महिलांसाठी ‘ही’ खास ऑफर

Tousif Mujawar

जर्मनीत सापडले 2 हजार वर्षे जुने अस्त्र

Amit Kulkarni

सर्वात मोठे पाय असणारी महिला

Patil_p

प्रत्येकाला गुरू मानून शिकत गेलो : सुबोध भावे

prashant_c
error: Content is protected !!