Tarun Bharat

एका संशयिताला अटक, तिघांवर नजर

हत्तीण मृत्यू प्रकरणी केरळचे मंत्री के. राजू यांची माहिती : संशयिताने पुरवली स्फोटके

वृत्तसंस्था/ तिरुवअनंतपुरम्

केरळमधील पल्लकड जिल्हय़ात गर्भवती हत्तीणीची हत्या झाल्यानंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि वातावरण अधिकच तापत चालले होते. परिणामी या प्रकरणाची केरळ तसेच केंद्र सरकारनेही गंभीर दखल घ्यावी लागली आहे. शुक्रवारी या प्रकरणी केरळ वनविभागाच्या (केएफडी) तपास पथकाने एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याने स्फोटके पुरवल्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी केएफडी आणि पोलिसांच्या तपास पथकाने आणखी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. तथापि त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. तर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव पी. विल्सन आहे. तो मसाल्याच्या शेती इस्टेटशी संबंधित आहे. याप्रकरणी आणखी काहीजणांना 24 तासात अटक केली जाऊ शकते, असेही वनमंत्री के. राजू यांनी म्हटले आहे.

या हत्याप्रकरणाची निर्भत्सना होऊ लागल्याने अखेर मुख्यमंत्री आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही उत्तर द्यावे लागले आहे. दोषींना कठोर शासन देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्विट करुन दोषींचा शोध घेतला जाईल तसेच शिक्षाही त्वरीत केली जाईल, असे म्हटले होते. तथापि काही लोक याचे भांडवल करुन घृणास्पद अभियान चालवत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही याबाबत तातडीने तपास करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा वन अधिकाऱयांनी भेट दिली आहे. याचा शोध घेण्यासाठी वनविभाग आणि केरळ पोलिसांचे संयुक्त पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. सध्याच्या तपासात आम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. यातील दोषींचा निश्चितच शिक्षा केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.  केरळच्या सायलेंट व्हॅली जंगलामध्ये हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाण्यास दिला होता. या दुर्घटनेमध्ये त्या हत्तीणीचा मृत्यु झाला होता.  हत्ती पकडणाऱया वनविभागातील एका कर्मचाऱयाने समाज माध्यमांवर या हत्तीणीच्या धैर्याची माहिती दिल्यानंतर सर्वच माध्यमातून या कृत्यावर कठोर टिका होऊ लागली होती. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनीदेखील शोक व्यक्त करत हत्तीणीला न्याय मिळायला हवा, असे ट्विट करत दोषींना कठोर शिक्षा करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती.

Related Stories

गुजरातमध्ये 21,000 कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

भारतात मागील 24 तासात 66,732 नवे कोरोना रुग्ण; 816 मृत्यू

datta jadhav

पीएम दक्ष’ पोर्टल देणार रोजगाराला प्रोत्साहन

Patil_p

24 तासात केवळ 3 नवे रुग्ण

Patil_p

पेगॅससवरून पुन्हा संसद ठप्प

Patil_p

चीनच्या ‘5-जी’ला जिओचा काटशह

Patil_p