Tarun Bharat

एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, के. आर. शेट्टी किंग संघांची विजयी सलामी

फीनिक्स मास्टर लीग क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित फीनिक्स एव्हिएशन पुरस्कृत फीनिक्स मास्टर्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादिवशी एक्स्ट्रिम स्पोर्ट्स संघाने फॅन्को क्लबचा 7 गडय़ाने तर के. आर. शेट्टी किंग संघाने ऍडक्होकेट पाटील लायन्स संघाचा 23 धावाने पराभव करून विजयी सलामी दिली. सागर गौरगोंडा (एक्स्ट्रिम) भरत गाडेकर (के. आर. शेट्टी) सामनावीर ठरले. 

युनियन जिमखाना मैदानावर फीनिक्स मास्टर्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फीनिक्स इन्स्टिटय़ूट ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या संयोजका अलिशा नायर, ओमकार बेनके, युनियन जिमखानाचे सचिव प्रसन्ना सुंठणकर, सचिन कलवार, सलिम फनिबंद, स्पर्धा सचिन परशराम पाटील, सचिन साळुंखे, मिलिंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत परशराम पाटील यांनी केले. अलिशा नायर यांनी यष्टीपूजन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिल्या सामन्यात फॅनको संघाने 20 षटकात सर्वबाद 128 धावा केल्या. समिउल्लाने 3 चौकारासह 22 धावा केल्या. एक्स्ट्रिमतर्फे सागर गौरगोंडाने 13 धावात 2, मिलिंद बेळगावकरने 20 धावात 2 तर जयदीप देशपांडेने 31 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एस्क्ट्रिम स्पोर्ट्स संघाने 14 षटकात 3 बाद 130 धावा काढून सामना 7 गडय़ांनी जिंकला. सागर गौरगोंडाने 2 षटकार व 10 चौकारासह 37 चेंडूत 68, जावेद मुदीनूरने 1 षटकार 4 चौकारासह 34 धावा केल्या. फॅनकोतर्फे शंकर होसमनीने 23 धावात 2 गडी बाद केले.

दुपारच्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग संघाने 20 षटकात 5 बाद 155 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 5 चौकारासह 52 धावा करून स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकविले. प्रणय शेट्टीने 2 षटकार 5 चौकारासह 24 चेंडूत 43 धावा केल्या. ऍड. पाटील लॉयन्स सुनिल सक्रीने 18 धावात 2, विशाल जी ने 35 धावात 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऍड. पाटील लायन संघाचा डाव 19.4 षटकात सर्वबाद 127 धावात आटोपला. उत्तम शिंदेने 1 षटका 3 चौकारासह 36, सुनील पाटीलने 1 षटकार 3 चौकारासह 34 धावा केल्या. के. आर. शेट्टी संघातर्फे भरत गाडेकरने 19 धावात 4, अनंत माळवीने 30 धावात 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सलिम फणिबंद, रफिक व महांतेश पाटील यांच्या हस्ते सामन्यातील प्रभावशाली मिलिंद बेळगावकर व सामनावीर सागर गौरगोंडा यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे तौफिक कादरी, प्रवीण कुराडे, प्रणय शेट्टी यांच्या हस्ते प्रभावी खेळाडू प्रशांत लायंदर, सामनावीर भरत गाडेकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

शनिवारचे सामने

  • फॅन्को क्रिकेट क्लब वि. बीसीसी मच्छे सकाळी 9.00 वा.
  • विश्रुत स्ट्रायकर्स वि. एक्स्ट्रिम स्पोर्ट्स दुपारी 1 वा.

Related Stories

दडपशाही झुगारून बंद पाळा

Amit Kulkarni

अर्णा, प्रितम, तनिष्का विजेते

Amit Kulkarni

मुचंडीत राहते घर कोसळून नुकसान

Amit Kulkarni

• जिल्हय़ात 4,89,264 शेतकऱयांना ‘किसान सन्मान’चा लाभ

Patil_p

सौंदत्ती यात्रेतून परिवहनला दीड कोटींचे उत्पन्न

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना शुल्क पावती-जुना पास दाखवून करता येणार प्रवास

Patil_p