Tarun Bharat

एक अजब सहल

एकदा आटपाट नगरातल्या टीव्हीच्या विविध वृत्तवाहिन्यांवरील अँकर्सच्या मनात आलं की आपण एकमेकांशी स्पर्धा करतो, भांडतो. आपापसात सौहार्द निर्माण व्हावं म्हणून सगळय़ांनी सहलीला जावं. सहल छोटी असावी. सकाळी जाऊन संध्याकाळी प्राईम टाईम सुरू व्हायच्या आत परत यायचं होतं. 

सकाळी सगळे वेळेवर रेल्वे स्टेशनवर जमले. लोकलमध्ये राखून ठेवलेल्या डब्यात चढले. डब्यात आणि डब्याच्या बाहेर ठिकठिकाणी त्यांच्या वाहिन्यांचे लोगो चिकटवले होते. शिवाय विविध प्रायोजकांनी जाहिराती लावल्या होत्या. सहल दुसऱया दिवशी प्रत्येक वाहिनीवर दाखवली जाणार होती. 

गाडी सुटली. सर्वांनी आपापली न्याहारीची पार्सले काळजीपूर्वक – पार्सल देणाऱया हॉटेल्सची नावे कॅमेऱयात टिपली जावीत अशा रीतीने उघडली. काही जणांनी चाय-बिस्कुटची पार्सलं, काहींनी सामिष पदार्थांची पार्सलं आणली होती. काहींच्या पार्सलात फक्त नोटा निघाल्या. त्यामुळं ते उपाशी राहिले. इतरांची पोटपूजा पार पडली. मग गाण्याच्या भेंडय़ा खेळण्याचा बूट निघाला. दोन संघ तयार झाले. एका संघातली निवेदिका म्हणाली, “एक मोठ्ठी ब्रेकिंग न्यूज – आपल्या टीमवर र अक्षर आले आहे. आणि…’’ पाचदहा मिनिटे खेळ चालला. एका संघावर न अक्षर आले. गाणे आठवण्यासाठी संघ काही वेळ थांबला. तेव्हा प्रतिपक्षातला नाठाळ अँकर ओरडू लागला, “तुमच्यावर न अक्षर आले आहे. तुम्हाला गाणे येते की नाही ते सांगा. आटपाट नेशन वॉन्टस टू नो.’’ पलीकडचा संघ गाणे गाण्याचा प्रयत्न करीत होता. पण हा अँकर कोणाला बोलू देत नव्हता की गाऊ देत नव्हता. नुसता ओरडत होता. त्यामुळे भेंडय़ांचा खेळ बंद पडला.

सहलीच्या ठिकाणी पोहचल्यावर सर्वांनी जेवणे केली. ओरडणारा अँकर कुठेतरी गेलेला असताना बाकीच्यांनी डंब शराज या खेळाचा बूट काढला. एका संघातील भिडूला कागदावर सिनेमाचं नाव किंवा गाणं लिहून द्यायचं. त्यानं तोंडातून अवाक्षर न काढता केवळ मुद्राभिनय करून ते आपल्या संघातल्या भिडूंना सांगायचं. त्या भिडूंनी ते ओळखून दाखवायचं. 

सगळय़ांनी कट करून ओरडणाऱया अँकरवर राज्य आणलं आणि त्याला चिठ्ठीवर नाव लिहून दिलं  ‘झूठ बोले, कौवा काटे.’ अँकरने तासभर वेडीवाकडी तोंडं करून सिनेमाचं नाव सांगायचा प्रयास केला. सगळे ओरडत होते  “लवकर सांगा, वुई वॉन्ट टू नो. आटपाट नेशन वॉन्ट्स टू नो.’’ 

Related Stories

अधिकस्य अधिकं फलम्…..(सुवचने)

Patil_p

कृष्ण व सत्यभामा विवाह

Patil_p

देवरूप होऊ सगळे

Patil_p

एफआरपीला उत्पन्नाचा आधार हवा

Patil_p

गुरुभक्त भगवंतांना फार आवडतात

Patil_p

बोलू आवडी कौतुके…

Patil_p
error: Content is protected !!