Tarun Bharat

एक कोटी घरांना मंजुरी

केंद्र सरकारने आतापर्यंत 1 कोटी परवडणाऱया घरांना मंजुरी दिली असल्याची माहिती उपलब्ध झालीय. काही दिवसांपूर्वी साडेसहा लाख घरांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागाकरीता मंजुरी दिली गेली आहे.

केंद्र सरकारने परवडणाऱया घरकुल प्रकल्पांना चालना देण्यासाठी सध्या कंबर कसली आहे. 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळवून देणारी पंतप्रधान आवास योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत. याअंतर्गत काही दिवसांपूर्वी साडेसहा लाख घरांना मंजुरी मिळवून देण्यात आली आहे. आजतागायत 1 कोटी घरांना मंजुरी मिळाली असून आता कामाने वेग घ्यायला सुरूवात केलीय. सर्व घरकुलांचे बांधकाम मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. आवास योजनेतील घरांपैकी 32 लाख घरे लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्याचेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले. वितरीत करण्यात आलेल्या घरांपैकी सर्वाधिक घरे आंध्र प्रदेश राज्याने मंजूर केली आहेत. या राज्यात 20 लाख घरांना मंजूरी मिळाली असून 15 लाखहून अधिक घरे उत्तर प्रदेशने मंजूर करवून घेतली आहेत. योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जास्तीत जास्त योजनेचा लाभ खरेदीदारांना मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

2015 मध्ये ही योजना देशभरात अंमलात आली. पण तुलनेने राज्यांनी गतीने या बाबतीत निर्णय घेतला नाही. योजना अस्तित्वात आल्यानंतर दिल्लीने एकही प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला नाही. केंद्राने 1.12 कोटी शहरी गरीब लोकांना घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून याअंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱयांना व्याज सवलतीचा लाभ उठवता येणार आहे. शहरी गरीब जनता आणि मध्यमवर्गीयांच्या 1 कोटी लोकांच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाला आहे. उर्वरीत 9 लाख घरांना येत्या 3 ते 4 महिन्यात मंजुरी मिळवून दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पूर्वीच्या तुलनेत आता मंजुरी मिळवून देणे व लगेच प्रकल्पांच्या कामांना सुरूवात करणे या प्रक्रिया वेगाने होत असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. परवडणाऱया घरांच्या बांधकामांना उशीर होऊ नये याकरीता सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता अफोर्डेबल हाऊसिंगचे प्रकल्प वेगाने कार्यरत होतील. घरासाठी ग्राहकांना कमी कालावधी वाट पाहावी लागणार आहे.

 व्याज सवलत सुरूच राहणार ?

परवडणाऱया घरकुल खरेदीदारांना सध्या आवास योजनेंतर्गत व्याजावर सवलतीचा लाभ मिळत आहे. याअंतर्गत खरेदीदारांना 2.67 लाख व्याज अनुदान मिळते आहे. ही व्याज सवलत योजना नव्या 2020 वर्षीही सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दृष्टीक्षेप आकडेवारीत..

एकूण मागणी- 1.12 कोटी

नव्या तंत्रज्ञानाचा वापर केलेली घरे 15 लाख

एकूण गुंतवणूक- 6.13 लाख कोटी रुपये

केंद्राची मदत- 1.63 कोटी रुपये

 

Related Stories

याला म्हणतात ‘प्रजा’सत्ताक

Patil_p

देखभाल कराराचे महत्त्व

Patil_p

डॉ. सतीश नाईक अपूर्व संस्कृत सोहळा!

Patil_p

बजेट-2020 : बांधकाम उद्योगाच्या वाढल्या अपेक्षा

Patil_p

घराची पारदर्शक सुंदरता…

Patil_p

नवे तंत्र देईल का गती…

Patil_p