Tarun Bharat

एक कोटी तीस लाख रुपयांच्या निधीतून विकास कामांना सुरुवात

इतिहासात पहिल्यांदाच देसूरमध्ये सात ठिकाणी भूमिपूजन

मजगाव : बेळगाव ग्रामीण भागातील देसूर येथे शनिवार दि. 12 फेब्रुवारी रोजी बेळगाव ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एकाच दिवशी सुमारे सात ठिकाणी विविध विकासकामांचे पूजन करून कामाला चालना करून दिली. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच देसूर गावामध्ये गावच्या विकासकामांचा धडाका पहायला मिळाला. यामध्ये सातेरी माऊली रस्त्यासाठी 40 लाख रुपये, महात्मा फुले गल्ली 10 लाख रुपये, स्मशान रस्ता, पाटीलनगर रस्ता, श्रीरामनगर रस्ता, माऊलीनगर रस्ता यासाठी 59 लाख रुपये तर सरकारी आदर्श प्रायमरी शाळेसाठी स्मार्ट रुमसाठी 11 लाख रुपयांचा निधी देऊन आज त्याचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच श्री बसवेश्वर मंदिरासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन देसूर गावचा सर्वांगीण विकास व्हावा, हेच माझे ध्येय आहे, असे ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

तसेच सरकारी आदर्श प्राथमिक शाळेसाठी 11 लाख रुपयांच्या निधीतून स्मार्ट रुमचे काम पूर्ण झाल्याने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते स्मार्ट रुमचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा एक वेगळय़ा पद्धतीने व मोठय़ा उत्साहाने ढोलताशा वाजून शाळेच्या पटांगणापासून स्मार्ट रुमपर्यंत मोठय़ा दिमाखात स्वागत करून स्मार्ट रुमचे उद्घाटन केले. याप्रसंगी आमदार हेब्बाळकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपल्या गुरुजनांचा व आपल्या मातापित्यांचा सर्वांनी आदर करावा, मन लावून अभ्यास करून आपले व आपल्या गावचे आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असा विद्यार्थ्यांना संदेश दिला.

त्यानंतर देसूर ग्रा. पं. सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी आमदार हेब्बाळकर यांचे व सुपुत्र मृणाल हेब्बाळकर तसेच एपीएमसी अध्यक्ष युवराज, कदम, सुळगे (ये.) ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष अरविंद वसंतराव पाटील, राजहंसगड येथील तालुका पंचायत माजी सदस्य सिद्धाप्पा छत्रे, भरमा पाटील, गेनाप्पा पाटील, सातेरी काळशेकर, तुरमुरी येथील रघुनाथ खांडेकर, एस. एम. बेळवटकर, तसेच खानापूर तालुक्यातून आलेल्या ग्रा. पं. सदस्यांचे मोठय़ा दिमाखात स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देसूर ग्रा. पं. च्या सदस्यांनी व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर समर्थकांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. ग्रा. पं. सदस्य जी. के. पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Stories

आनंदनगर-अनगोळ रस्त्याचे काम रखडले

Amit Kulkarni

शहरातील अनेक रस्त्यांची वाताहत

Amit Kulkarni

जीवनविद्या मिशनतर्फे ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा

Omkar B

जायंट्स परिवारचा आज पदग्रहण समारंभ

Amit Kulkarni

पंचायतराज अभियंत्याला लाच प्रकरणी अटक

Amit Kulkarni

विद्युत रोषणाईमुळे प्रशासकीय इमारतीने वेधले लक्ष

Amit Kulkarni