Tarun Bharat

एक चतुरस्त्र अभिनेता दिलीपकुमार

Advertisements

मनीषा सुभेदार / बेळगाव

अभिनयाचा बादशाह असणाऱया दिलीपकुमार यांनी अभिनयामध्ये हिमालयाइतकी उंची गाठली. तरीसुद्धा त्यांची पावले कायम जमिनीवर होती. विलक्षण ताकदीचा हा अभिनेता माणूस म्हणून अत्यंत साधा आणि विद्वान होता. बेळगावला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले होते. त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आणि आम्हाला दिसून आला त्यांच्यातील साधेपणा, त्यांचा आत्मविश्वास आणि बहुपेडी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व…..

दिलीपकुमार यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. एम. ए. जमादार भारावून गेले होते. 1989 मध्ये आझमनगर येथे एका शाळेच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळच्या आठवणींचा गोफ डॉ. जमादार यांनी उलगडला.

अभिनेते दिलीपकुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांना बेळगावसाठी निमंत्रण देणे हे कसे शक्मय झाले? या प्रश्नावर डॉ. जमादार म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. जमखानवाला हे बेळगावच्या अल-अमीन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ज्ये÷ विश्वस्त होते. त्यांची आणि दिलीपकुमार यांची घनिष्ठ मैत्री होती. त्या मैत्रीला जागून डॉ. जमखानवाला यांना त्यांनी बेळगावला येण्याचे वचन दिले होते आणि संस्थेच्या आझमनगर येथील शाळेच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहिले.

दिलीपकुमार यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय कोठे केली होती? या प्रश्नावर इंडॉलच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य होते. दुसरे दिवशी शाळेच्या उद्घाटनानंतर त्यांनी आमच्या समवेत भोजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामभाऊ पोतदार उपस्थित होते. या दोघांनी आपल्या गप्पांमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक आठवणींना, घटनांना उजाळा दिला होता आणि त्या गप्पा ऐकणे ही आमच्यासाठी पर्वणी होती.

तुम्हाला दिलीपकुमार यांचे व्यक्तिमत्त्व कसे वाटले? त्यांना भेटताच तुमची प्रतिक्रिया काय होती? या प्रश्नावर डॉ. जमादार म्हणाले, चित्रपटांमध्ये ते जसे भोळेभाबडे, साधे असे दाखविले जात तसेच प्रत्यक्षातही त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. भेटताक्षणीच कुणालाही आपुलकी वाटावी असेच त्यांचे वर्तन राहिले. हिंदी भाषेवर जितके त्यांचे प्रभुत्व होते, तितकेच प्रभुत्व इंग्रजी भाषेवर होते. मुख्य म्हणजे ते उत्तम वक्ते होते; ज्याची प्रचिती त्यांच्या भाषणाच्या दरम्यान आली. कारण एक अभिनेता म्हणून नव्हे तर समाजाचा एक महत्त्वाचा प्रतिनिधी म्हणून शिक्षणासंदर्भात त्यांनी फार मोलाचे विचार व्यक्त केले होते. मला सर्वाधिक जाणवलेला गुण म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. समाजातील अनेक घडामोडींचा त्यांचा अभ्यास होता. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरील त्यांचे निरीक्षण अचूक होते. एक अभिनेता इतका चतुरस्त्र असू शकतो याचे प्रत्यंतर त्यांच्या भेटीमध्ये आम्हाला आले. त्यांच्या समवेत पत्नी सायरा बानो यासुद्धा होत्या. या उद्घाटन समारंभाला 10 हजारांहून अधिक लोक जमले होते व संध्याकाळी संगीत कार्यक्रमही झाला होता, अशी माहिती डॉ. जमादार यांनी दिली. डॉ. ए. एस. अत्तार, सौदागर आदी यावेळी उपस्थित होते, असेही ते म्हणाले.

Related Stories

जायंट्स सखीतर्फे शेतकरी महिलांचा सन्मान

Omkar B

दत्त गल्ली वडगाव येथे अज्ञाताचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Rohan_P

मनपा निवडणूक प्रकरण न्यायालयात

Amit Kulkarni

तरूण भारतचा ‘बेळगाव पॅटर्न’ ठरला हिट

Patil_p

टेलिव्हिजन टेड युनियनच्या कर्नाटक अध्यक्षपदी अभिनेता राज के. पुरोहित यांची निवड

Patil_p

जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळय़ात

Patil_p
error: Content is protected !!