Tarun Bharat

एक चांगली बातमी

Advertisements

कोरोनाच्या दहशत माजवणाऱया बातम्यांमध्ये भारतीयांची कॉलर ताठ करणारी एक चांगली बातमी कधी आली आणि कधी गेली हे कळलं देखील नाही. अर्थशास्त्रातील कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार मिळालेले अमर्त्य सेन यांना नुकताच एक सन्मान लाभला. ‘बोर्ड ऑफ जर्मन बुक टेड’ यांनी गेल्या बुधवारी जागतिक शांततेसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना यंदाचा ‘पीस प्राईझ’ हा पुरस्कार (28,000 डॉलर्स) जाहीर केला आहे. 18 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार मिळेल. गेल्या वषी हा पुरस्कार ब्राझीलच्या छायाचित्रकाराला मिळाला होता. यापूर्वी अमर्त्य सेन यांनी नोबेल पुरस्काराची मिळालेली सर्व रक्कम समाजकार्यासाठी देणगी दिली आहे.

पुरस्काराच्या निमित्ताने अमर्त्य सेन यांची काही मते पाहूयात. जी पटतील ती आपण स्वीकारावीत. 

1. आपण इतिहासाशिवाय जगू शकत नाही. पण आपण इतिहासात जगणे टाळले पाहिजे.

2. मानवी हक्कांची संकल्पना माणुसकीवर आधारित आहे. हे हक्क एखाद्या देशाच्या नागरिकत्वातून किंवा सभासदत्वातून मिळत नाहीत, तर हे हक्क तमाम मानवतेचा अधिकार आहेत.

3. इतरांची मते आपल्या मतांशी जुळत नसतील तर चिडू नका. कारण सर्व माणसांना ह्रदये आहेत. प्रत्येक ह्रदयात भावना आहेत. त्यांना योग्य वाटणारे आपल्याला चुकीचे आणि आपल्याला योग्य वाटणारे त्यांना चुकीचे वाटू शकते.

4. सततचे परिवर्तन आयुष्याच्या चाकाला फिरते ठेवते आणि त्यातून वास्तवाचे अनेक पैलू दृग्गोचर होतात. शांतपणे जगत रहा, परिवर्तन सर्व दु:खांना आपल्यापासून मुक्त करते आणि आनंद घेऊन येते.

5. सह्रदय म्हणवणाऱया जगात दु:खांनी पोळलेली, भुकेने तडफडणारी, वंचित आयुष्ये जगणारी असंख्य माणसे कशी असू शकतात, दरवषी कोटय़वधी निष्पाप लेकरे उपासमारीने किंवा वेळेवर औषधोपचाराअभावी किंवा सामाजिक संरक्षणाअभावी प्राण का सोडतात हे समजत नाही. ही समस्या अर्थातच जुनी आहे… मला हे अगदी पटते की, ज्या जगात राहतो त्या जगाच्या विकासाची आणि परिवर्तनाची जबाबदारी आपणा लोकांवरच आहे. ही जबाबदारी इतर कोणाची असो वा नसो, आपली निश्चितच आहे. ज्या जगात आपण एकत्र राहतो त्या जगात आसपास घडणाऱया वाईट गोष्टींचा, समस्यांचा विचार आपण टाळू शकत नाही.

जागेअभावी फार थोडक्मयात लिहावे लागते आहे. जिज्ञासूंनी ‘द अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ हे त्यांचे पुस्तक अवश्य वाचावे.

Related Stories

निर्विवाद विजयाचा डंका!

Amit Kulkarni

हंगामा है क्यू..?

Patil_p

आरोपीच्या पिंजऱयात डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

रोहिंग्यांचे ओझे

Amit Kulkarni

बॉडी शेमिंग-बाह्यरूपाचे टोमणे

Amit Kulkarni

हिंदू देवतांची अवमानना निषेधार्ह

Amit Kulkarni
error: Content is protected !!