Tarun Bharat

एक झुंज वाऱयाशी

बेळगावच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मेडिको कल्चलर आर्ट असोसिएशनतर्फे दि. 31 रोजी  सायंकाळी साडेपाच वाजता केएलईच्या कन्व्हेशन सेंटर येथे ‘एक झुंज वाऱयाशी’ हा नाटय़प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पु. ल. देशपांडेलिखित या नाटकाचे दिग्दर्शन श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

आजच्या आधुनिक युगात माणूस स्वत:मधले माणूसपण गमावत चालला आहे. नीति, कल्पना, त्याग, प्रेम, परोपकार यांचे जोखड त्याला पेलवेना झाले आहे. वर्ग, वर्ण, जात, प्रांत, भाषा, लिंग, भेद, संस्कृती यांचा आधार तो स्वार्थ, सत्ता, ऐश्वर्य, भोग यासाठी करून घेऊ लागला आहे. अशा काळामध्ये पु. ल. देशपांडेंचे हे अनुवादित नाटक सादर होणे महत्त्वाचे आहे. रशियन नाटककार वोझोत्सव यांच्या ‘द लास्ट अपॉईंटमेंट’ या नाटकाचा अनुवाद आहे. या नाटकातील माणसाचा संघर्ष आपल्याला आतून हलवितो. घडीभर का होईना आपण माणूस असल्याची जाणीव करून देतो आणि आपण स्वत:बद्दल व इतरांबद्दल विचार करायला लागतो. हेच या नाटकातील असामान्यपण आहे.

या नाटकातील विचार हा कुठल्याही एका राजकीय विचारांशी नाते सांगणारा नसून तो माणसांच्या भल्याचा पाठपुरावा करणारा आहे. एक सामान्य माणूस थेट आरोग्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांचा राजीनामा मागतो. ते नैतिकतेच्या बळावरच ते सुद्धा ‘जे सत्तेवर असतात त्यांनी प्रामाणिक असायला हवं. आणि जो उपदेश ते इतरांना करतात तो त्यांनी स्वत: आचरणात आणायला हवा. अन्यथा आम्हाला तुमचा विश्वास वाटणार नाही. म्हणून मी सांगतो तुम्ही राजीनामा द्या,’ असे सुनावतो. हा पवित्राच खूप धाडसी आणि नाटय़मय आहे.

पु. लं. नी  तितक्मयाच गंभीरपणे व मूळ गाभ्याला धक्का न लावता अनुवाद केला आहे. या नाटकात दीपक करंजीकर, आशुतोष घोरपडे, श्रीनिवास नार्वेकर आणि शोभना मयेकर या सर्वांचा सार्थ अभिनय पाहण्याची संधी बेळगावकरांना मिळणार आहे.

ताणतणावाच्या जीवनामध्ये विरंगुळा हवा, या हेतूने डॉक्मटरांची ही संघटना स्थापन झाली. आणि दोन वर्षात नावारुपाला आली. ‘अर्धसत्य’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘गलती से मिस्टेक’, ‘नादप्रहर’ अशी अनेक दर्जेदार नाटके संघटनेने आणली आहे.

‘एक झुंज वाऱयाशी’ हे हटके नाटक असून रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. बसवराज बिजरगी, डॉ. नीता देशपांडे, सचिव राजेश लाटकर व खजिनदार अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

Related Stories

झलक कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेची….!

Patil_p

पोषणाचा खजिना

tarunbharat

छंदातून जनजागृती

Patil_p

भक्तीच्या विठ्ठलपुरी, वसली कारापूर नगरी

Omkar B

एक भावलेला नाटय़प्रयोग बेळगावकरांची

Patil_p

वेणुग्रामचे दुर्गवैभव

tarunbharat