Tarun Bharat

एक तास कमी झोपताय

शरीर निरोगी राहण्यासाठी आहार, व्यायाम याबरोबरीने किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची  असते ती पुरेशी व शांत झोप.  झोपेच्या काळातील विश्रांतीमुळे शरीराला नवचैतन्य मिळते. म्हणूनच आपण दररोज सकाळी उठून नव्या जोमाने कामास सुरुवात करतो.

  • झोपेचे हे महत्त्व सर्वश्रुत असले तरी आज सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक लोकांना पुरेशी झोप घेता येत नाही. टीव्ही आणि मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियामुळे  तर झोपेचा सत्यानाश झाला आहे. पण यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
  • ‘एल्सवियर’ नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.
  • हृदयविकाराच्या झटक्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या 42 हजार लोकांच्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला होता.
  • सामान्यतः व्यक्तीला आठ तासांची झोप माणसासाठी गरजेची असते. यापेक्षा अगदी एक तासाच्या कमी झोपेनेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे.
  • जर एखादी व्यक्ती एक तास कमी झोपली असेल तर पुढच्या दिवशी हार्टऍटॅकचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो.
  • कमी झोपेचा थेट संबंध उच्च रक्तदाब, हार्ट ऍटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांशी आहे. कमी झोप घेणार्या लोकांमध्ये बेचैनी आणि डिप्रेशनच्या समस्या उद्भवू शकतात.
  • संशोधनानुसार पुरेशी झोप न घेणार्या लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार अधिक येतात. अशा लोकांमधील आत्महत्येचे प्रमाणही अधिक आहे.

Related Stories

आता चेहऱ्यावरच्या मुरुमांना म्हणा रामराम

Kalyani Amanagi

स्ट्रेच मार्क (stretch marks) घालवण्याचे ‘हे’ उपाय नक्की करून बघा

Kalyani Amanagi

जाणून घ्या कोकम फळाचे फायदे

Kalyani Amanagi

टक्कल पडलेल्यांना दिलासा

Omkar B

नटराजासन

Omkar B

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर टिप्स

Kalyani Amanagi
error: Content is protected !!