Tarun Bharat

‘एक थी बेगम’ 30 सप्टेंबरला पुन्हा येणार

प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडते. परंतु सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. बहुप्रतीक्षित ‘एक थी बेगम’ चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून यात अनुजा साठे अशरफ भाटकरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसेल मात्र ती लीला पासवान या नावाने. मकसूदचे बेकायदेशीर साम्राज्य उलथवून टाकण्याचा आणि तिचा पती झहीरच्या (अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञेचे पालन करत, ती या सीझनमध्ये निर्भयपणे पुरुषांच्या जगात वर्चस्व गाजवताना दिसणार आहे. सत्तेतील प्रत्येकजण तिच्या शोधात आहे. अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणी असे सगळेच.

सिझन 1 मध्ये अशरफच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. ज्यात तिचा पती झहीर, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन मकसूदचा (अजय गेही) विश्वासू होता, जो मारला गेला. त्यानंतर अशरफ सपना या नावाने बार डान्सर बनून झहीरच्या हत्येसाठी जबाबदार ठरलेल्या प्रत्येकाला मारण्याची योजना आखते. मात्र तिच्या योजना निष्फळ ठरतात आणि सिझन 1चा शेवट अशा एका टप्प्यावर येतो जिथे अशरफ जिवंत राहणार की नाही, हा प्रश्न उद्भवतो.  सिझन 2ची सुरुवात लीला पासवानच्या शोधाने होते. अशरफने घातलेला आणखी एक वेष ज्यात, ती मृत्यूला पराभूत करून दुबईच्या भयानक आणि शक्तिशाली डॉनला गुडघ्यावर आणण्याच्या तिच्या ध्येयाकडे परतते. तर अशरफची भूमिका साकारणारी अनुजा साठे म्हणते, ‘सर्वात शक्तिशाली लोक ते असतात, ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते. तिच्यासाठी, तिच्या प्रेमासाठी जे सर्वात महत्वाचे होते, ते माझ्या व्यक्तिरेखेने आधीच गमावले आहे. आपल्या पतीचा बदला घेण्यासाठी आणि तिची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तिने कोणत्याही थराला जाण्याचा निर्धार केला आहे. माझा विश्वास आहे, तिची अडथळय़ांवर मात करण्याची दृढता आजच्या स्त्रियांच्या लढाईचे प्रतिनिधित्व करणारी आहे.  या सीरिजमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा,  गुप्ते, मीर सरवर, वांडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

संकलन – अनुराधा कदम

Related Stories

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

Patil_p

दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आमिर खान

Patil_p

पौराणिक मालिकांवर कलर्सचा भर

Patil_p

लिंडसे लोहान अडकली विवाहबंधनात

Patil_p

दख्खनचा राजा ज्योतिबामध्ये मोठय़ा ज्योतिबाची एण्ट्री

Patil_p

अभिनेते भरत जाधव यांनी केले ‘हे’ आवाहन

Tousif Mujawar