Tarun Bharat

एक दिवसाचा दिलासा; पुन्हा तीच अवस्था

अचूक बातमी ‘तरुण भारत’ची, मंगळवार, 27 जुलै 2021, स. 11.15

● सोमवारी रात्री अहवालात 874 बाधित ● एकूण तपासण्या 10,756 ● जिल्ह्यात 2.,964 बेड रिक्त ● बाधित वाढ तीन अंकावरच स्थिर ● जिल्ह्यात कोरोना मुक्कामी आलाय का?

सातारा / प्रतिनिधी : 

एकीकडे पुण्या-मुंबई सह राज्यभरात कोरोना संसर्ग आटोक्यात आलाय. मात्र सातारा जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीने मोठा तडाखा दिलेला असतानाच त्यातच सुरू असलेल्या करून संसर्गाच्या स्थितीमध्ये फारसा काही बदल होत नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. रविवारच्या अहवालात 586 जणांचा अहवाल बाधित आला तर फक्त सात जणांचा मृत्यू झाला. यामुळे थोडा दिलासा लाभला असताना हा दिलासा एक दिवसाचा ठरला असून सोमवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा बाधित वाढीचा वेग जैसे थे आहे. 

सोमवारी अहवालात 874 बाधित

गेल्या आठवड्यात अनेक वेळा rt-pcr टेस्टिंगचा पॉझिटिव्हिटी दर खाली घसरल्याचे दिसून आलेले आहे. रविवारी आवाजात तो चांगलाच खाली घसरला होता. मात्र, सोमवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा तोच राहिलेला असून एकूण 310,756 जणांच्या तपासण्या केल्यानंतर 874 जणांचा अहवाल आलेला आहे.

बाधित वाढ तीन अंकावर स्थिर

गेली दीड ते दोन महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला तर सातत्याने वाढ तीन अंकावर वर स्थिर आहे. सातत्याने वाढीचा रेशो सातशे-आठशेच्या पटीत राहिलेला असून तो अद्यापही तसाच स्थिर आहे.  लॉकडाऊन केला तरी आणि नाही केला तरी जिल्ह्यातील बाधित वाढ थांबत नसल्याचा अनुभव विदारक आहे. गेल्या दोन तीन दिवसात मृत्यू दरात झालेली घट दिलासादायक रविवारी बळींची संख्या केवळ 7 होती. आता सोमवारच्या अहवालात बाधित वाढीचा रेशो तेथेच राहिला असून जर बळींची संख्या वाढतीच असेल तर मात्र याबाबतचा प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 

महापुरात कोरोना विषय गायब

 गत आठवड्यापासून पावसाने जोर धरल्याने गेल्या दोन-तीन दिवसात तर जिल्ह्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. एकीकडे कोरोना संसर्ग आणि दुसरीकडे पावसाने थैमान घातल्याने सध्या जिल्हा प्रशासनाला दोन्ही आघाड्यांवर लढावे लागत आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना या विषयावर एक शब्द देखील उच्चारला गेला नाही. सध्या आता प्रशासनाच्या आकडेवारीचा कोरोना सुरु आहे की काय असा सवाल नागरिक विचारत आहेत.

जिल्ह्यात कोरोना मुक्कामी आलाय का?

गेल्या दोन अडीच महिन्यांपासून ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा फटका बसला आणि गंभीर स्थिती निर्माण झाली. त्यानंतर बाधित वाढीचा आलेख खाली घसरू लागल्याचा दिलासा होता. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यापासून बाधित वाढीचा आलेख तीन अंकावर स्थिर आहे. फक्त रविवारी अल्प संख्येने येतो आणि पुन्हा सोमवार ते शुक्रवार तो तीन अंकावर सातशे आठशे च्या पुढे स्थिर असून यामध्ये कराड सातारा व अधूनमधून खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये त्याची तीव्रता जास्त आहे. सातत्याने सुरू असलेले तीन अंकी वाट पाहता जिल्ह्यात कोरोना मुक्कामाला आलाय की काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने  1354761, एकूण बाधित 214657, घरी सोडण्यात आलेले 201725 , मृत्यू 5157 उपचारार्थ रुग्ण 10118 
सोमवारी जिल्हय़ात बाधित 586, मुक्त 1,045, बळी 7

Related Stories

जिल्हय़ात आता होम आयसोलेशन : 90 मुक्त

Patil_p

तापोळा खोरे संपर्कहीन

datta jadhav

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

datta jadhav

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav

महाबळेश्वर पालिकेचे बांधकाम रखडले

Patil_p

लक्ष्मण माने, घरतांवर गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन

Patil_p