Tarun Bharat

एक नळ दोन बिलाबाबत चौकशी करा

Advertisements

आमदार अनिल बेनके यांच्यासह मनपा आयुक्तांना निवेदन : तोडगा काढण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील नागरिकांकडे एक नळजोडणी असताना दोन बिले देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 2006 पासून सुरू असून, आता एल ऍण्ड टी कंपनीकडे पाणीपुरवठा नियोजनाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीकडून थकीत बिलासाठी तगादा लावण्याची शक्मयता आहे. त्यामुळे याबाबत तोडगा काढावा, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. आणि आमदार अनिल बेनके यांना विनय चव्हाण व लखन चव्हाण यांनी दिले.

पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारासाठी महापालिकेने पाणीपुरवठा मंडळाकडे कारभार सोपविला होता. त्यावेळी काही नळधारकांच्या नावे थकबाकी असल्याचे दाखविण्यात आले होते. पण प्रत्यक्षात नळधारकांच्या नावे दोन बिले असल्याचे निदर्शनास आले आहे. काही नागरिकांनी बिले वेळेत भरून पावती घेतली आहे. तरीदेखील त्यांना आणखी एक बिल देण्यात आले आहे. त्यामुळे थकीत बिलासाठी पाणीपुरवठा मंडळाने तगादा लावला होता. याबाबत गोंधळी गल्ली येथील रहिवासी विनय चव्हाण यांनी पाणीपुरवठा मंडळाकडे चौकशी केली असता एक नळजोडणी आणि दोन नळ बिले देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 2016 मध्ये पाणीपुरवठा मंडळाकडे अर्ज करून एका नळाची दोन बिले येत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी सर्वेक्षणही केले होते. दक्षिण आणि उत्तर भागातील 193 नळधारकांना अशाप्रकारे दोन बिले येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तशी माहितीदेखील पाणीपुरवठा मंडळाकडून उपलब्ध झाली आहे. हा प्रकार 2006 पासून सुरू आहेत. पाणीपुरवठय़ाचे नियोजन महापालिकेकडे असल्यापासून दोन बिले देण्यात येत होती. त्यामुळे सदर बिलाबाबत चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आमदार अनिल बेनके व महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना देण्यात आले.

Related Stories

लोककल्प फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना दप्तदारांचे वाटप

Amit Kulkarni

सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया ठप्प; परप्रांतियांना फटका

Patil_p

बेनकनहळ्ळी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील मंडळांना पोलिसांकडून मार्गदर्शन

Amit Kulkarni

पुरामुळे नुकसान झालेल्या वकिलांना मदत

Patil_p

पूर्व भागात लम्पिस्कीनमुळे एका दिवसात चार जनावरांचा मृत्यू

Amit Kulkarni

दोन वेगवेगळय़ा अपघातात एक ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!