Tarun Bharat

एक महिन्याचे वेतन क्रीडामंत्र्यांकडून जाहीर

नवी दिल्ली

 केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजु यांनी कोरोना व्हायरस संकटाशी सामना करण्याकरिता आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भाजपाच्या प्रत्येक खासदाराने आपल्या खासदार निधीतील प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी मदत म्हणून दिली आहे. या भीषण संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक नागरिक सज्ज झाला असून खासगी उद्योग समुहानी पंतप्रधान निधीला हातभार लावला आहे. भारत सशक्त आणि निरोगी राहण्याकरिता शासनाचे प्रयत्न चालू आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री रिजीजु यांनी ही माहिती आपल्या फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात आतापर्यंत संपूर्ण जगात मृतांची संख्या 30000 पेक्षा अधिक झाली आहे.

Related Stories

बॅडमिंटनपटू ऍक्सेलसेन कोरोना बाधित

Patil_p

कुसल परेराकडे लंकेच्या वनडे संघाचे नेतृत्व

Patil_p

व्यवस्थापक आर्टेटा यांच्या करारात वाढ

Patil_p

हॉकी स्टेडियमला राणी रामपालचे नाव

Patil_p

भारत-श्रीलंका मालिकेला आता 18 जुलैपासून प्रारंभ

Patil_p

यजुवेंद्रसाठी ती थेट दुबईत!

Patil_p