ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रातील मोदी सरकारकडून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- 35 लोधी एस्टेटमध्ये प्रियंका गांधी या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. जवळपास 20 वर्षापासून त्या याच निवासस्थानी राहत आहेत.


या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ठरलेल्या कालावधी नंतरही बनवण्यात राहिल्यास भाडे तथा दंड भरावा लागेल. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. असे म्हटले आहे.
याबरोबरच गृह मंत्रालयाकडून एलपीजी संरक्षण हटवल्यानंतर तुम्हाला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. ज्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी बंगल्याचे वाटप, रिटेंशनची तरतूद नाही, म्हणून लोधी रोड वरील हाऊस नं. 35 चे अलॉटमेंट रद्द करण्यात येत आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.