ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एअर इंडियाच्या एक महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या वैमानिकाचा शनिवारी मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या जवळपास 200 क्रू मेंबर्सचे विलगीकरण करण्यात आले आहे.
हे वैमानिक एप्रिलमध्ये वयाच्या 58 व्या निवृत्त झाले होते. त्यांनी एअरबस – ए 320 चे संचालनही केले होते. तसेच त्यांनी आपल्या करिअरमध्ये डीजीसीए मध्ये फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर म्हणूनही काम केले होते.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, कोरोनाची लक्षणे आढलेल्या तीन ते चार जणांना, तसेच हलकी लक्षणे असणाऱ्या 30 ते 40 जणांना आणि 150 वैमानिक आणि क्रू मेंबर्स ना क्वारंटाइन केले आहे. काही पॅसेंजर्सना कोरोनाची बाधा झाल्यानंतर जवळपास 200 केबिन क्रू मेंबर्समध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे विलिनीकरण करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.