Tarun Bharat

एक वर्षाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार – बाळासाहेब थोरात

मुंबई \ ऑनलाईन टीम

महाराष्ट्र काँग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच काँग्रेस आमदार एक महिन्याचं वेतन तर बाळासाहेब थोरात स्वत: एक वर्षाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबाबत भूमिका मांडली आहे.देशात आणि राज्यात कोरोनाच गंभीर संकट आहे. या परिस्थितीला आपण सामोरं जात आहोत. लसीकरण बाबत आग्रही आहोत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोफत लसीकरणाचा आग्रह होता. याबद्दल महाआघाडीचे देखील एक मत होतं. लसीकरणासाठी राज्याला मोठा खर्च आर्थिक भार येणार आहे. पण, लसीकरण खर्चाबाबत नवा  अतिरिक्त कुठलाही टॅक्स लावणार नाही,असं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.

सीरम संस्थेचे अदर पुनवला हे आता जागतिक केंद्रबिंदू बनले आहेत, त्यांना वाय सिक्युरिटी देण्यात आली आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

Related Stories

पत्रकार सिद्दिक कप्पनला पाच दिवसांचा जामीन मंजूर

datta jadhav

जत तालुक्यात नऊ हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा

Archana Banage

भारतातील 83 टक्के कोरोनाबाधित रुग्ण 60 वर्षाखालील

prashant_c

मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत

Archana Banage

तरुण भारतवर पहा कोल्हापूरचा राजा! यंदाचा लूक वेगळाच, उद्या कोल्हापुरात आगमन

Rahul Gadkar

देशात राहणार केवळ पाच सरकारी बँका

datta jadhav