Tarun Bharat

एक हाथ मदतीचा

सध्याचा काळ खूपच कठीण आहे.  आज प्रत्येकालाच एकमेकांची खरी गरज आहे.  म्हणूनच आपण मदतीचा हात पुढे करायला हवा. जमेल ती आणि जमेल तेवढी मदत करायला हवी. तुम्ही टाकलेलं छोटंसं पाऊलही  अनेकांचं आयुष्य बदलू शकतं. अनेकींना मदत करायची इच्‹छा असते. मात्र नेमकं काय करावं हे कळत नाही. तुम्ही वैयक्तिक पातळीवर तसंच एकत्रितपणे बरंच काही करू शकता.

  • सध्या  रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी होते आहे. अशा परिस्थितीत रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा पुरवता येईल. फक्त जेवणच नाही तर गरजेच्या इतर वस्तूही पुरवता येतील.
  • तुम्ही स्वस्तात जेवण उपलब्ध करून देऊ शकता. शक्य असेल तर मोफतही देऊ शकता. याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर करा आणि मागणीनुसार जेवण पुरवा.
  • तुमच्या कॉलनीतल्या महिलांशी चर्चा करून एका घरातून किमान दोन माणसांचं जेवण उपलब्ध होतं का ते बघा. पाच महिलांनी तयारी दाखवली तरी दहा जणांचं जेवण पुरवता येईल.
  • शेजारीपाजारी किंवा ओळखीतल्या वृद्ध व्यक्तींना किराणा सामान, फळं, भाज्या, दूध आणून देणं किंवा त्यांच्या जेवणाची सोय करणं अशी कामं करता येतील.
  • कोरोना रुग्णांना शारीरिक मदतीसोबतच  मानसिक सहकार्याचीही आवश्यकता असते. तुम्ही किंवा घरातील व्यक्ती कोरोनातून बरी झाली असल्यास कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देता येईल. त्यांच्या मनात सकारात्मक वृत्ती बाणवता येईल. त्यांना उभारी देता येईल.

Related Stories

हे तय्यार हम

Amit Kulkarni

सनाने अशे कमी केले वजन

Amit Kulkarni

टिकवा नात्यातला गोडवा

Amit Kulkarni

उशीराने आई होताना…

Omkar B

मल्टिटास्किंग गरजेचे पण…

Amit Kulkarni

लढाई अंकिताची

Amit Kulkarni
error: Content is protected !!