नवी दिल्ली
एचडीएफसी म्युच्युअल फंडने खुल्या बाजारामधील देवाणघेवाणीच्या माध्यमातून जस्ट डायलमधील आपली 2.73 टक्क्यांची हिस्सेदारी विकली आहे. सदरचा व्यवहार हा 108 कोटी रुपयामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. नियामकाकडे नोंदवलेल्या माहितीनुसार ‘जस्ट डायल’मध्ये 8.33 हिस्सेदारी ठेवणाऱया एचडीएफसी म्युच्युअल फंडने खुल्या बाजारातील देवाणघेवाणीच्या आधारे आपली 2.73 टक्के म्हणजे 16,90,653 समभाग विकले आहेत. या समभागांची विक्री ही 24 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आली आहे.