Tarun Bharat

एचसीएल टेकचा निव्वळ नफा 31 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली

 माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत 31.1 टक्क्यांनी वाढला आहे. वाढीसोबत नफा 3,982 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार वर्षभर अगोदर समान तिमाहीत हा नफा 3,037 कोटी रुपयांवर राहिल्याची नोंद केली आहे.

याचदरम्यान कंपनीचा महसूल वर्षभर अगोदर 18,135 कोटी रुपयांच्या तुलनेत 6.4 टक्क्यांनी वाढून 19,302 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत हा निव्वळ नफा 26.7 टक्के आणि महसूल 3.8 टक्क्यांनी वाढल्याची नोंद केली आहे.

कंपनीने या अगोदर या वृद्धीसाठी 1.5 ते 2.5 टक्क्यांचे अंदाज जाहिर केले  होते. परंतु एचसीएल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी विजयुकमार यांनी म्हटले आहे, की आम्ही तिमाहीच्या आधारे तिसऱया तिमाहीत स्थिर चलनावर महसूलात 3.5 टक्क्यांची आणि वर्षाच्या आधारे 1.1 टक्क्यांची वृद्धी प्राप्त केली आहे.

मजबूत कामगिरी

कंपनीने डिजिटल, क्लाउड आणि उत्पादन आणि विविध टक्क्यांपर केलेल्या कामगिरीमुळे व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. याचा लाभ म्हणून तिमाहीत कंपनीने मजबूत नफा कमाई केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Stories

डिश टीव्हीचे अध्यक्ष गोयल यांचा संचालक मंडळाचा राजीनामा

Patil_p

एचडीएफसी बँक मेडिकल सुविधांसाठी करणार मदत

Patil_p

रिलायन्सला 16 हजार कोटींचा नफा

Patil_p

ग्रामीण प्रादेशिक बँकांना सरकारकडून 670 कोटीचे भांडवल

Omkar B

जुलैमध्ये 21.07 लाख लोकांनी केला हवाई प्रवास

Patil_p

श्रीराम प्रॉपर्टीचा येणार आयपीओ

Amit Kulkarni