Tarun Bharat

एच-1बी व्हिसा स्थगित करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोनामुळे अमेरिकेत बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. बेरोजगारीची ही समस्या दूर करण्यासाठी एच-1बी व्हिसाला स्थगिती देण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार आहे. एच-1बी व्हिसाला स्थगिती दिल्यास देशाबाहेरील कोणालाही रोजगार मिळवण्यासाठी अमेरिकेत येता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, हा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेतील प्रशासनातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एच-1बी व्हिसाच्या आधारे ‘आयटी’ क्षेत्रात बहुसंख्य परदेशी युवकांनी अमेरिकेत रोजगार मिळवला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकांचे एम्प्लॉयमेंट व्हिसा आणि एच-1बी व्हिसा स्थगित करण्याचा विचार सुरू केला आहे. 

अमेरिकेतील आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबरपासून सुरू होते. तेव्हापासून एच-1बी व्हिसा स्थगित केला जाऊ शकतो. तसे झाल्यास बाहेरील देशातील कोणालाही जोपर्यंत एच-1बी व्हिसावरील स्थगिती उठवली जात नाही, तोपर्यंत विदेशी नागरिकांना रोजगारासाठी अमेरिकेत बंदी राहील. मात्र, सध्या अमेरिकेत असलेल्या व्हिसा धारकांना या स्थगितीचा कोणताही फटका बसणार नाही. दरम्यान, एच-1बी व्हिसा स्थगितीचा निर्णय अद्याप झाला नसून, पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.

Related Stories

…अन् थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे, राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप

datta jadhav

कृषी कायद्यांच्या विरोधात संसदेबाहेर करणार निदर्शने

Patil_p

जगभरातील बळींचा आकडा 50 हाजारांवर

Patil_p

मान्सूनचा गोवा आणि दक्षिण कोकणात प्रवेश

Nilkanth Sonar

हिमाचलप्रदेशात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

Rohan_P

राष्ट्रपती कोविंद गावी पोहोचताच भावूक ; माती कपाळावर लावत जन्मभूमीला केलं वंदन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!