Tarun Bharat

एजाझ पटेल न्यूझीलंड संघाबाहेर

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमध्ये होणाऱया आगामी बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंडच्या संघामध्ये फिरकी गोलंदाज एजाझ पटेलला वगळण्यात आले आहे. भारताविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील सामन्यात एजाझ पटेलने एका डावात 10 बळी मिळविण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली होती.

यापूर्वी असा विश्वविक्रम इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळेने नोंदविले आहेत. अलिकडेच झालेल्या भारताविरूद्धच्या दुसऱया कसोटीत पटेलने पहिल्या डावात 10 गडी बाद केले होते. दोन कसोटीच्या मालिकेसाठी 13 जणांचा न्यूझीलंड संघ जाहीर करण्यात आला आहे.

न्यूझीलंड संघ- टॉम लॅथम (कर्णधार),ब्लंडेल, बोल्ट, कॉनवे, मॅट हेन्री, जेमिसन,  मिचेल, निकोल्स, रचिन रविंद्र, साऊदी, रॉस टेलर, वॅग्नर आणि यंग.

Related Stories

रशियाऐवजी चेन्नईत होणार ‘चेस ऑलिम्पियाड’

Patil_p

उत्तराखंड बाद फेरीमध्ये दाखल

Patil_p

विल्यम्सनने कसोटी कर्णधार सोडले

Patil_p

दुसऱया कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल

Patil_p

फ्रान्सची कॅरोलिन गार्सिया अजिंक्य

Patil_p

सराव स्पर्धेत अँडी मरे खेळणार

Patil_p