Tarun Bharat

एज्युकेशन इंडिया संस्थेतर्फे आहार किट वाटप

प्रतिनिधी / बेळगाव

मातृदिनाचे औचित्य साधून एज्युकेशन इंडिया संस्थेच्यावतीने डॉ. मंजित जैन व संस्थेच्या सदस्यांतर्फे सफाई कामगार महिलांना आहार धान्याचे किट देण्यात आले. अनगोळ येथील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱया सर्व सफाई कर्मचारी महिलांना हे किट देण्यात आले. कोरोना काळात सफाई कर्मचारी कायम काम करत आहेत. त्यांच्यामुळे शहर स्वच्छ होण्यास मदत होत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची नोंद घेणे आवश्यक आहे. या हेतून हे किट देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्व सफाई कर्मचाऱयांनी मास्क धारण करावा, ग्लोव्हजचा वापर करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Related Stories

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या दोघांची निवड

Amit Kulkarni

गटारींवरील झाकणे हटविल्याने धोका

Amit Kulkarni

अर्धवट कामे मार्चपर्यंत तातडीने पूर्ण करा

Omkar B

बेळगावच्या बासमतीला भेसळीचा सुगंध…!

Amit Kulkarni

बीएससीच्या शिक्षणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Rohit Salunke

चोरी प्रकरणातील 37 लाखांचे दागिने जप्त

Amit Kulkarni