Tarun Bharat

एटीएमद्वारे पैसे चोरणाऱया चोरटय़ांना म्हापशात अटक

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा शहरात एटीएम मशिनना टार्गेट करून आतमध्ये स्किमिंग डिवायसचा वापर करून लाखो रुपये चोरणाऱया दोघा बलगेरियन नागरिकांना पकडण्यात म्हापसा पोलिसांना यश आले असून आयवो पेट्रो मोरचीनो (47) व मिलन आयवोनो दावरासकी अशी त्यांची नावे आहेत. दोघेही हडफडे येथे भाडय़ाने राहत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान या दोघाही संशयित चोरटय़ांना रिमांडसाठी न्यायदंडाधिकाऱयांकडे हजर केले असता दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आठ दिवसांपूर्वीच गायब झाले होते पैसे

आठ दिवसापूर्वीच म्हापशात स्टेट बँकच्या खोर्ली, गणेशपुरी, अन्साभाट, म्हापसा, हळदोणा येथे असलेल्या एटीएम मशीनमधून अज्ञात चोरटय़ांनी लाखो रुपये चोरून नेण्याची तक्रार सुमारे 60 हून अधिक नागरिकांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली होती. या तक्रारदारामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारीवर्गाचा समावेश होता. एटीएममधील पैसे एकाच दिवसात कसे गायब झाले हे मोठे प्रश्नचिन्ह म्हापशात निर्माण झाले होते. म्हापसा पोलिसांनी सर्वांच्या लेखी तक्रारी नोंदवून घेऊन ठेवल्या होत्या. चोरटय़ांना पकडणे पोलिसांना एक आव्हानच बनून राहिले होते.

एकटय़ाला हडफडेत तर दुसऱयाला अस्नोडात अटक

शनिवार दि. 4 रोजी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मिलीना पुरोहित यांनी सेंट अँथोनी अपार्टमेंटमधील एटीएममधून अज्ञात चोरटय़ानी स्किमर डिव्हायसचा वापर करून पैसे नेल्याची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात दिली असता पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी याची त्वरित दखल घेत एक पोलीस पथक तयार करून याकामी लावले. सीसीटीव्ही पॅमेरामधून आढळलेल्या वर्णनानुसार म्हापसा पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करीत सर्वांना घटनेची माहिती देत सर्वत्र पाळत ठेवली होती. संशयित हडफडे येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ते राहत असलेल्या ठिकाणी धाव घेऊन त्या चोरटय़ांची चौकशी केल्यावर वर्णनावरून दोघेही हडफडे येथे राहत असल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळाली. एकटय़ा चोरटय़ाला हडफडे तर दुसऱयाला अस्नोडा येथे पकडण्यास पोलिसांना यश आले.

चौकशीअंती म्हापसा पोलिसांनी दोघांचीही तपासणी केली असता त्यांच्याजवळ लॅपटॉप, सहा भ्रमणध्वनी, कार्डरिडर, स्किमींग मशिन, हार्डडिस्क आदी जप्त करम्यात आले आहे. या दोघांची बारकाईने चौकशी केल्यावर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. म्हापसा भोवताल परिसरात झालेल्या एटीएम चोरीमध्ये या दोघा चोरटय़ांचा हात असावा असा कयास आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार ईशाद वारंग, फ्रँकी वाझ, राजेश कांदोळकर, लक्ष्मीकांत नाईक, विजय नाईक, अभिषेक कासार, सर्वेश नाईक यांनी कारवाई केली.

Related Stories

“नवा सोमवार” उत्सवासाठी डिचोलीवासीय सज्ज

Amit Kulkarni

गोव्यातील प्रवासी बस वाहतुकीच्या प्रश्नावर तोडग्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार, बस मालक संघटनेने घेतली वाहतुकमंत्र्यांची भेट

Omkar B

अखेर बाबुशविरोधी मूळ तक्रार कोर्टात सादर

Amit Kulkarni

तृणमूलच्या नेत्यांकडून आपल्याकडेही संपर्क

Amit Kulkarni

भाजीच्या वाहनांवर मोले चेकनाक्यावर बंदी घालावी

Omkar B

मंगळवारी गोव्यात राष्ट्रीय निर्यात परिषद

Omkar B