Tarun Bharat

एटीएम मशीन फोडण्याचा रामतीर्थनगर येथे प्रयत्न

प्रतिनिधी /बेळगाव

रामतीर्थनगर येथील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

नंदी कॉम्प्लेक्समधील इंडिया वनचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. शेटर तोडून चोरटय़ाने आत प्रवेश केला असून एटीएम मशीनमधील रोकड पळविण्यासाठी मशीन तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रयत्नात त्याला यश आले नाही. यासंबंधी तुषार हिरेकुडे यांनी फिर्याद दिली आहे.

रविवारी मध्यरात्री 2.05 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटा एकटाच होता. आपली ओळख लपविण्यासाठी त्याने चेहरा झाकला होता. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही टिळकवाडी, सदाशिवनगर परिसरात एटीएम मशीन फोडण्याचे प्रयत्न झाले आहेत. या प्रयत्नांना यश आले नाही. याची जाणीव असूनही गुन्हेगार मशीनमधील रोकड पळविण्यासाठी वारंवार त्या फोडण्याचे प्रयत्न करतात. खासकरून माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱया, घरफोडय़ा, चेनस्नॅचिंगचे प्रकार वाढले आहेत. वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

येळ्ळूरच्या कुस्ती मैदानाला छत्रपती मालोजीराजे उपस्थित राहणार

Omkar B

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे

Archana Banage

दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेतर्फे नाना शंकरशेठ जयंती साजरी

Patil_p

‘निपाणी’ला वळिवाचा फटका, सर्व्हेचे आदेश

Omkar B

पंधरा दिवसांपासून भाग्यनगरात पाणीपुरवठा ठप्प

Amit Kulkarni

नव्या वर्षात 3 अंगारकी संकष्ट चतुर्थी

Patil_p