Tarun Bharat

एटीपीच्या मानांकनात मेदवेदेव्ह अग्रस्थानी

वृत्तसंस्था/ पॅरीस

रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव्हने सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या पुरूषांच्या एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत अग्रस्थानावर झेप घेताना सर्बियाच्या जोकोविचची मक्तेदारी संपुष्टात आणली.

एटीपीच्या मानांकनात यापूर्वी नेहमीच जोकोविच, नदाल, फेडरर आणि अँडी मरे यांच्यात चुरस राहत असे. दरम्यान रशियाच्या 26 वर्षीय मेदवेदेव्हने सर्बियाच्या जोकोविचला अग्रस्थानावरून खाली खेचले. एटीपीच्या मानांकनात अग्रस्थान मिळविणारा मेदवेदेव्ह हा तिसरा रशियन टेनिसपटू आहे. यापूर्वी रशियाच्या कॅफेलनीकोव्ह आणि मॅरेट सॅफीन यांनी एटीपीतील अग्रस्थान पटकाविले होते. सर्बियाच्या जोकोविचने तब्बल 361 आठवडे एटीपीतील अग्रस्थान स्वतःकडे राखण्याचा विक्रम केला आहे.

एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत रशियाचा मेदवेदेव्ह 8615 गुणांसह पहिल्या, सर्बियाचा जोकोविच 8465 गुणांसह दुसऱया, जर्मनीचा व्हेरेव्ह 7515 गुणांसह तिसऱया, स्पेनचा नदाल 6515 गुणांसह चौथ्या, ग्रीकचा सित्सिपस 6445 गुणांसह पाचव्या, रशियाचा रूबलेव्ह 5000 गुणांसह सहाव्या, इटलीचा बेरेटेनी 4928 गुणांसह सातव्या, नॉर्वेचा कास्पर रूड 3915 गुणांसह आठव्या, कॅनडाचा फेलिक्स ऍलीयासिमे 3883 गुणांसह नवव्या आणि पोलंडचा हुरकेझ 3496 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Related Stories

क्रिकेटपटू बिस्नोई, निर्मोही कोरोना बाधित

Patil_p

नारायण, कुलदीप यांना नौकानयनमध्ये कांस्यपदक

Patil_p

अर्जुन पुरस्कारासाठी संदेश झिंगन, बाला देवी यांची शिफारस

Patil_p

पाकिस्तानचा फलंदाज अबिद अलीवर अँजिओप्लॅस्टी

Patil_p

अश्विनने एक नऊ ‘लपवला’, तरीही…!

Patil_p

इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून स्टोक्स बाहेर

Amit Kulkarni