Tarun Bharat

एटीपी चषक टेनिस कॅनडा, बेल्जियमचे विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ सिडनी

डेनिस शॅपोव्हॅलोव्हने स्टेफानोस सित्सिपसवर विजय मिळवित कॅनडाला ग्रीसवर एटीपी चषक सांघिक टेनिस स्पर्धेतील लढतीत विजय मिळवून दिला. ही लढत ब्रिस्बेनमध्ये घेण्यात आली. 

शॅपोव्हॅलोव्हने दुसऱया एकेरीत सित्सिपसवर 7-6 (8-6), 7-6 (7-4) असा विजय मिळवित कॅनडाला ग्रीसवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. त्याआधी फेलिक्स ऑगर ऍलिसियामीने थंड वाऱयाशी मुकाबला करीत मिशेल पर्व्होलाराकिसचा 6-1, 6-3 असा पराभव करून कॅनडाला आघाडीवर नेले होते.

अन्य एका लढतीत बेल्जियमने मॉल्डोव्हाचा 2-0 असा पराभव केला. बेल्जियच्या द्वितीय मानांकित व कर्णधार स्टीव्ह डार्सिसने अलेक्झांडर कोझबिनोव्हचा 6-4, 6-7 (4-7), 7-5 असा तर डेव्हिड गॉफिनने रॅडू अल्बॉटचा 6-4, 6-1 असा पराभव करून संघाला लढत जिंकून दिली.

Related Stories

डरेन गॉ पंचगिरी करणार नाहीत

Amit Kulkarni

मुलानीचे 5 बळी, जैस्वालचे शतक

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्ध मालिकाविजय

Amit Kulkarni

आयपीएल फायनलची गीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Patil_p

भारताचा 7 गडय़ांनी विजय, शॉ सामनावीर

Patil_p

सिनसिनॅटी स्पर्धेत फ्रान्सची गार्सिया विजेती

Patil_p
error: Content is protected !!