Tarun Bharat

`एनटीपीसी’मध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा करणे शक्य

कार्पोरेट कार्यालयाकडून आदेशाची गरज, तर `सिव्हिल’सह जिल्ह्यातील रुग्णांची मोठी सोय

रजनीश जोशी/सोलापूर

सोलापूरसह महाराष्ट्रात कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन निर्मिती वाढवण्याकरिता फताटेवाडीच्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा (एनटीपीसी) उपयोग होऊ शकतो. तिथे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करता येणे शक्मय आहे.

कोरोनाचा विषाणू फुफ्फुसात शिरला तर रुग्णाला श्वास घेणे कठीण होते, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. सोलापूरातील सिव्हिल रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक रुग्णांना खासगी हॉस्पिटलकडे पाठवावे लागत आहे. तिथेही पुरेसा ऑक्सिजन नाही. अशा स्थितीत ऑक्सिजन निर्मिती वाढवणे हाच पर्याय आहे. त्यासाठी ‘एनटीपीसी’मध्ये ‘ओटू’ निर्मिती प्रकल्प सुरू करता येणे शक्मय आहे. फताटेवाडीवरून सोलापुरात ऑक्सिजनची वाहतूक करणे सहज शक्मय आहे. शिवाय सोलापूर जिह्याच्या गरजेपेक्षा जास्त निर्मिती झाल्यास राज्यात अन्यत्र तो पाठवता येऊ शकतो.

आदेश मिळाल्यास ऑक्सिजन निर्मिती – शिंदे

फताटेवाडीच्या एनटीपीसी प्रकल्पात ऑक्सिजन निर्मिती केली जात नाही. पण आम्हाला आमच्या कार्पोरेट ऑफिस किंवा दिल्लीतून आदेश मिळाल्यास आम्ही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प टाकू शकतो. गरजेनुसार त्यातून ऑक्सिजन मिळू शकेल. – शरद शिंदे, पब्लकि रिलेशन ऑफिसर, एनटीपीसी, सोलापूर

जिल्हाधिकाऱयांना पत्र दिले – डॉ. ठाकूर

सिव्हिल हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनची गरज आहेच. आम्ही जिल्हाधिकाऱयांकडे त्याबाबतचे पत्र दिले आहे. हवेतील ऑक्सिजन काढून घेण्याचा प्रकल्प सुरू करावा किंवा कॉन्स्नटेटेड ऑक्सिजन मिळावा, असे पत्राच म्हटले आहे. एनटीपीसीकडून ऑक्सिजन मिळाल्यास त्याचा रुग्णांना फायदाच होईल. – डॉ. संजीव ठाकूर, डीन, व्हीएम मेडिकल कॉलेज

ऑक्सिजन मिळणे महत्त्वाचे – डॉ. दोशी

कोणत्याही मार्गाने रुग्णांना ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. एनटीपीसीद्वारे असा प्रकल्प सुरू होत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. त्यातील तांत्रिक गोष्टी तातडीने पूर्ण करून ऑक्सिजन निर्मिती व्हायला हवी आणि त्याचा पुरवठा ताबडतोब सुरु व्हायला हवा. – डॉ. बाहुबली दोशी, नागरिक, सोलापूर

Related Stories

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कडय़ावरुन पडून मृत्यू

prashant_c

विहिरीत एसटी-रिक्षा कोसळून 21 ठार

Patil_p

सोलापूर : बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – प्रहार’ची मागणी

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये ४९ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

सोलापूर शहरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यातील शहरात 52 तर ग्रामीणमध्ये 888 नवे कोरोना रुग्ण

Archana Banage