Tarun Bharat

एनडीटीव्ही प्रवर्तक प्रणोय रॉय यांना दिलासा नाहीच

प्रतिनिधी/ मुंबई

एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणोय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका यांनी सेबीने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात याचिकेवर त्यांना कोणताही दिलासा देण्यास सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार देत याचिका फेटाळून लावली.

2018 मध्ये इनसाईडर ट्रेडिंग नियमांचा भंग केल्याचा ठपका सिक्युरिटी आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) वतीने रॉय पती-पत्नीवर ठेवण्यात आला होता. एनडीटीव्हीचे ट्रेडिंग रॉय यांनी केले होते. मात्र, त्यावेळेस त्या रोख्यांच्या किमतीबाबत अनिश्चितता होती अशी छुपी माहिती त्यांच्याकडे होती असा रॉय यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्याविरोधात रॉय पती-पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सेबीने अधिकारांचा गैरवापर करून पाठवलेली नोटीस रद्द करावी आणि संबंधित कागदपत्रे तपासण्यासाठी द्यावी, अशा मागण्या रॉय यांनी याचिकेमार्फत केल्या होत्या. त्यावर सोमवारी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. तेव्हा दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत याचिकाकर्त्यांना सेबीला न्यायाधिकरणाकडे सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देत न्यायालयाने याचिका फेटाळली.

Related Stories

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ

Patil_p

सिसोदियांच्या जामिनावर 31 मार्च रोजी निर्णय

Patil_p

अमेरिकेत शिख विद्यार्थ्याला कृपाण बाळगता येणार

Patil_p

मृत पित्याला जिवंत करण्यासाठी…

Patil_p

1 जुलैपासून नवीन कामगार कायदा?

Amit Kulkarni

18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर

Patil_p