Tarun Bharat

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीला अटक, पुणे पोलिसांची कार्यवाही

ऑनलाईन टीम / मुंबई

मुंबई ड्रग्ज बस्ट प्रकरणात एनसीबीचा (NCB)स्वतंत्र साक्षीदार असलेला किरण गोसावीला (Kiran Gosavi) अटक करण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले असून 2018 च्या फसवणूक प्रकरणासंदर्भात त्याची चौकशी केली जात असल्याचे पुणे पोलिसांकडुन( Pune Police) स्पष्ट करण्यात आले .किरण गोसावीने सोमवारी लखनौमध्ये आत्मसमर्पण करण्याची ऑफर दिली होती पण पोलिसांनी त्याचे आत्मसमर्पण स्विकारले नाही.त्यानंतर तीन दिवसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

एनसीबीने क्रूझ जहाजावर छापे टाकल्यानंतर बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा(Shahrukh khan) मुलगा आर्यन (Aryan khan)आणि इतरांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खानसोबत किरण गोसावी सेल्फीमध्ये दिसला होता .त्याच्यावर खंडणीचाही आरोप करण्यात आला आहे.

2018 च्या फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी लुकआउट परिपत्रक जारी केल्यानंतर फरार झालेल्या गोसावीने महाराष्ट्रात (Maharashtra)आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. त्यांनी KPG ड्रीमझ सोल्युशन्स नावाची कंपनी चालू केली होती ज्याद्वारे विविध क्षेत्रातील इच्छुकांना परदेशात नोकरी देण्यासाठी पैसे उकळले होते. कंपनीने प्रमोशनसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला.अशाच एका इच्छुकाने गोसावी याला मलेशियातील एका हॉटेलमध्ये नोकरीच्या बहाण्याने 3.09 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात आल्यानंतर किरण गोसावी याने आपली फसवणूक केल्याचे इच्छुकाला समजले.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह (Dyaneshwer sing)यांनी पुष्टी केली की किरण गोसावी आणि मनीष भानुशाली छाप्यादरम्यान एनसीबीचे साक्षीदार होते ज्यामुळे आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर सहा जणांना अटक करण्यात आली.

Related Stories

स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी सातारा पालिकेची अफलातून स्पर्धा

Patil_p

बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगेत आढळला

Archana Banage

भाजी मंडईत खिशातून 8 हजार रुपये लंपास

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 85 हजारांवर

datta jadhav

Kolhapur; राधानगरी धरणात 40 टक्के पाणीसाठा

Abhijeet Khandekar

राहुल गांधी यांच्या अमेठीतील कार्यालयावर छापा

prashant_c