Tarun Bharat

एन्डोस्कोपीच्या अंतरंगात….

अलीकडे विविध आजार-विकारांमध्ये एन्डोस्कोपी करण्याचा पर्याय अवलंबला जातो. त्यामुळे हा शब्द तसा नवा राहिलेला नाही. तरीही अनेकांना याविषयी नेमकेपणाने माहिती नसते. त्यासाठी ही उपयुक्त माहिती…

एन्डोस्कोप एक यंत्र असते. याच्या साहाय्याने आपण शरीरातील वेगवेगळ्या भागात डोकावू शकतो. बघू शकतो. तेथील अवयावाचा आतून फोटो काढू शकतो. काही गाठ, व्रण असेल तर तुकडा (बायोप्सी) घेऊ शकतो. तपासणीसाठी स्त्राव घेता येऊ शकतो.

एन्डोस्कोपीने श्वासनलिकेत बाह्य वस्तू अडकली असेल तर काढता येऊ शकते. सहसा पोकळ अवयवात, नळीत हे उपकरण टाकून त्या अवयवाला बघितले जाते.

सामान्यपणे नाक, तोंड अशा शरीरातील नैसर्गिक छिद्रातून नळी टाकली जाते.  उदर पोकळी, सांधे, छातीचा पिंजरा यांसारख्या एरवी बंद असलेल्या पोकळीची स्थिती बारीक छेद घेऊन त्यातून नळी टाकून जाणून घेता येते. (उदा. लॅपरोस्कोपी)

काही वर्षांपूर्वी एन्डोस्कोप हे एखाद्या फुकणीसारखे कडक न वाकणारे असत. आता सहसा फायबरचे एन्डोस्कोप जे लवचिक आणि बारीक असतात ते वापरण्यात येतात. या एन्डोस्कोपमध्ये अतिसूक्ष्म लवचिक काचेच्या नळ्यांची जुडी वापरता येते.

एन्डोस्कोपी, अन्ननलिका, जठर, आतडे (छोटे, मोठे) पित्ताश्याची नळी, स्वादूपिंड (पॅन्क्रियाज) यांची केली जाते. याखेरीज नाकाची, सायनसेस, कान, मूत्राशय, गर्भ पिशवी आणि नळ्या यांचीसुद्धा करता येते.

Related Stories

नियमित ‘या’ 5 टिप्स फॉलो करा, डॉक्टर आणि औषधांना ठेवा दूर

Archana Banage

मूळव्याधीवर पर्याय शस्राक्रियांचा

Omkar B

लेसर उपचारांचा दिलासा

Omkar B

हिवाळ्याच्या दिवसात कोणती फळे खावीत?

Kalyani Amanagi

नवं इन्सुलिन : मधूमेहींना दिलासा

Amit Kulkarni

प्रोटिन्सचे सेवन कसासाठी

Amit Kulkarni