Tarun Bharat

एपीएमसीमध्ये कोरोनाची धास्ती वाढली

सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करण्याची गरज

प्रतिनिधी/ बेळगाव

एपीएमसी हे जिह्यातील मुख्य बाजारपेठ असून दररोज लाखेंची उलाढाल या ठिकाणी होते. त्यामुळे या ठिकाणी गर्दीही मोठय़ा प्रमाणात उसळते. सध्या एपीएमसीमध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. एपीएमसीमधील भाजीमार्केटमध्ये एकच गोंधळ उडतो. त्यामुळे याठिकाणी सुरक्षित अंतराचा अभाव दिसून येत आहे. सध्या एपीएमसीमध्ये अनेक व्यापाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

एपीएमसीमध्ये मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असली तरी नागरिकही नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. येथे गर्दी होत असल्याचे पाहून लॉकडाऊन काळात एपीएमसीमधील भाजीमार्केट शहरातील इतर तीन ठिकाणी हलविण्यात आले होते. कालांतराने हे मार्केट पुन्हा एपीएमसीमध्ये हलविण्यात आले असले तरी सुरक्षित अंतराचा फज्जा या ठिकाणी उडत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱयांनी आणि एपीएमसी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे अनेक जण धास्तावले असून नेमक्मया वेळेतच हे मार्केट सुरु करण्याची मागणी होत आहे.

बेळगाव जिह्यातील एपीएमसी मार्केट हे महसुलाच्या दृष्टिकोणातून महत्वाचे आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव मोठय़ा प्रमाणात होत असून अनेक जण भयभीत झाले आहेत. तर काही जण आता एपीएमसीमध्ये नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करत आहेत. नुकतीच एपीएमसीमधील मृत्यू झालेल्या व्यापाऱयांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. आता पुन्हा भयावह परिस्थिती निर्माण झाली असून याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आता लवकरच एपीएमसीमध्ये बटाटा व रताळी यांची स्थानिक आवक वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच दक्षता घेवून गर्दी टाळून व्यवहार करण्याची गरज आहे. बेळगाव तालुक्मयाबरोबरच जिह्यातील आणि महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, पंजाब आदी ठिकाणाहून येणाऱया व्यापाऱयांची गर्दी आता उसळत असते. त्यामुळे स्थानिक शेतकऱयांबरोबरच इतरांनीही गर्दी न करता आपले व्यवहार पार पाडण्याची काळाची गरज आहे. सध्या एपीएमसी व भाजीमार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून ही गर्दी टाळून कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

शंकर मारिहाळ यांना बढती

Amit Kulkarni

चोरीप्रकरणी दोघा जणांना अटक

Amit Kulkarni

मराठी भाषेतही फलक बसवा

Amit Kulkarni

बेंगळूर सभासदांकडून बेळगाव जिल्हा युवा फुटबॉल संघाची निवड चाचणी

Amit Kulkarni

कुडचडेतील ‘मनिग्राम’ कार्यालयात पुन्हा चोरी

Patil_p

मोफत धान्याच्या मुदतीत पुन्हा वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!