Tarun Bharat

एपीएमसीमध्ये पहाटे 5 ते दुपारी 1 पर्यंतच व्यवहार

भाजीमार्केटमध्ये नियम पाळण्याचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

एपीएमसी भाजीमार्केटमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य घेतले जात नाही. त्यामुळे आता पहाटे 5 ते दुपारी 1 पर्यंतच भाजी विक्री व खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात सॅनिटायझर व मास्कचा वापर याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. एपीएमसीमध्ये भाजी खरेदी-विक्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. जे दुकानदार आणि भाजी खरेदी व विक्रीदार नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर यापुढे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Related Stories

कारवार जिल्हय़ात गुरुवारी तीन कोरोनाबाधित

Patil_p

बेडकिहाळमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Patil_p

बुसेलोसिस लसीकरण मोहिमेला प्रारंभ

Amit Kulkarni

शब्दगंधच्या बैठकीत काव्यवाचन

Amit Kulkarni

लाच स्वीकारताना सहकार खात्याचा कर्मचारी एसीबीच्या जाळय़ात

Amit Kulkarni

चर्मकार युवक मंडळातर्फे संत रोहिदास जयंती साजरी

Amit Kulkarni