Tarun Bharat

एपीएमसी केंद्राचा अभाव, रस्त्यावरच शेतमालाची विक्री

चिकोडी शहरातील स्थिती :  शेतकरी – व्यापाऱयांची गैरसोय : केंद्र उभारण्याची शेतकऱयांची मागणी

वार्ताहर / चिकोडी

चिकोडी हे जिल्हा केंद्र व तालुक्मयाच्या दक्षिण पूर्व माळभागातील गावांचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. चिकोडी शहर व परिसरातील सुमारे 15 ते 20 किलोमीटर परिघातील शेतीला पाणी नसल्यामुळे कापूस, मका, तुर, ज्वारी अशी पिके घेतली जातात. पण त्याची विक्री करण्यासाठी चिकोडी शहरात एपीएमसी केंद्र नसल्यामुळे दर गुरुवारी हा रस्त्यावरच बाजार भरत आहे. चिकोडी येथे शेतीमालाची विक्री करण्यासाठी सुसज्ज असे एपीएमसी केंद्र सुरू केल्यास समस्या निकाली निघून परिसरातील शेतकऱयांना लाभदायक ठरणार आहे.

चिकोडी शहरात शेतीमालाच्या विक्रीसाठी एपीएमसीचे केंद्र नसल्याने शेतकरी व व्यापाऱयांची गैरसोय होत आहे. निपाणी येथे कृषी बाजारपेठ पूर्वीपासून कार्यरत आहे. पण त्या भागातही आता कृषी उत्पन्न बाजार समितीत आणून विकण्यासारखी पिके घेण्यात येत नाहीत. परिणामी त्याचा फारसा उपयोग शेतकऱयांना व व्यापाऱयांना होत नाही. सदलगा येथे 15 वर्षापूर्वी कोटय़वधी रुपये खर्च करून एपीएमसी संकुले निर्माण करण्यात आली. पण तीही निष्क्रीय अवस्थेत आहेत. सदलगा येथे कृषी बाजारपेठ असूनही जुन्या बसस्थानक आवारातच सौदे भरविले जातात. त्यामुळे येथील बाजार समितीचे संकुल मात्र पडिक बनले आहे. तर चिकोडी येथे गरज असतानाही एपीएमसी संकुले उभारण्यात आलेली नाहीत.

चिकोडी परिसरात माळभाग असल्याने कापूस व मका अशी पिके घेण्यात येतात. पण विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतीमालाची रस्त्यावरच खरेदी विक्री करण्यात येत आहे. व्यापाऱयांकडून  बसवेश्वर सर्कलच्या परिसरात, मिनी विधानसौधसमोर आपली दुकाने थाटली जातात. व्यापाऱयांच्या व्यवहाराच्या पारदर्शकतेची कोणाकडूनही तपासणी केली जात नाही. किंवा त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. शेतकऱयांनाही नाईलाजाने शेतीमाल मिळेल त्या दराने विक्री करून जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱयांचे नुकसानच होत आहे. चिकोडीत अधिकृत कृषी उत्पन्न बाजार समितीचे केंद्र व व्यापारावर नियंत्रण नसल्यामुळे नाईलाजास्तव नुकसान सोसूनही शेतकऱयांना माल विक्री करावा लागत आहे. चिकोडी, केरुर, हिरेकुडी, नणदी, नागराळ, उमराणी, बेळकुड, नेज, केरुरवाडी, जोडकुरळी, बंबलवाड, जोडट्टी, करगाव गावात पाण्याची अधिक सोय नसल्यामुळे शेतकरी मका व कापूस पिके घेतात. दर गुरुवारी चिकोडी येथे शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱयांची गर्दी होते. दूरचे अंतर असल्यामुळे वाहतूक भाडे परवडत नसल्याने येथे रस्त्यावर मिळेल त्या दराने शेतीमाल विकत आहेत.

Related Stories

मच्छे ब्रम्हलिंग मंदिरातील महाप्रसाद रद्द

Patil_p

निवेदन फाडून केला प्रशासनाचा निषेध

mithun mane

‘ते’ गवळी कुटुंबीय अद्याप भरपाईपासून वंचित

Amit Kulkarni

महाराष्ट्राने केंद्राकडे पाठपुरावा करावा

Amit Kulkarni

हंगरगे परिसरातील शिवारात गव्यांचा धुमाकूळ

Omkar B

होनगा येथील मंदिरांच्या ट्रस्टी- पुजाऱयाची चौकशी करा

Patil_p