Tarun Bharat

एपीएमसी रोडशेजारील चेंबर देताहेत अपघातास निमंत्रण

जिल्हा प्रशासनासह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष : अनेक विकासकामे अर्धवट, उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ांमुळे धोका

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेली विकासकामे अर्धवट झाली असून पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया एपीएमसी रोडशेजारी गटारीचे बांधकाम अर्धवट झाले असून उघडय़ावर असलेल्या सळय़ा अपघातास निमंत्रण देत आहेत. याकडे जिल्हा प्रशासन आणि स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र बहुतांश ठिकाणी केवळ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून गटारीचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. याचा धोका नागरिकांना होत आहे. उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ांमुळे काही वाहनधारक जखमी झाले आहेत. तर तिघांचा बळी गेला आहे. तरीदेखील अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाची पूर्तता करण्यासाठी आणखीन किती बळी हवेत, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

अझमनगर क्रॉस ते एपीएमसी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आले होते. यापैकी बॉक्साईट रोड ते एपीएमसीपर्यंतच्या रस्त्याचे दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच दुभाजक, सायकल ट्रक व फूटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र हे काम केवळ एका बाजूच्या रस्त्याशेजारील पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱया बाजूच्या रस्त्याशेजारील गटारीचे बांधकाम तसेच फुटपाथचे काम अर्धवट राहिले आहे. ठिकठिकाणी चेंबर उघडे असून त्या चेंबरच्या लोखंडी सळय़ा उघडय़ावर आहेत. एपीएमसी मार्केट यार्डमध्ये दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच अनेक भाजीविपेते, दुचाकी आणि तीनचाकी वाहने घेवून खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे सदर रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ा रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. वाहने रस्त्याशेजारी घेतल्यास अपघात होण्याची शक्मयता आहे.

उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा

उघडय़ावर असलेले चेंबर अपघातास निमंत्रण देत असून स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे. अनर्थ घडण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे व नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

बाजारपेठेत रंगपंचमीचे साहित्य दाखल

Amit Kulkarni

हिंडलगा बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

तरुण भारत सौहार्द सोसायटीचे आकर्षक व्याजदर!

Amit Kulkarni

1 नोव्हेंबर काळादिन विशेष

Amit Kulkarni

आधार सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष देसाई

Omkar B

गाळे रिकामी करण्यासाठी कारवाईचा विचार

Amit Kulkarni