Tarun Bharat

एफसी गोवाची जमशेदपूरवर मात, इगोर अँग्युलोचे दोन गोल

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

इगोर अँग्युलोने केलेल्या दोन गोलांच्या बळावर एफसी गोवाने जमशेदपूर एफसीचा आरंभीच्या पिछाडीनंतर 2-1 गोलानी पराभव करून आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आपला तिसरा विजय साकारला. वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात मध्यंतराला जमशेदपूरचा संघ स्टिफन इझेने केलेल्या एक गोलने आघाडीवर होता.

सामन्याच्या पहिल्या सत्रात जमशेदपूर एफसीने एफसी गोवावर वरचष्मा राखला. एफसी गोवाने पहिल्या सत्रात दिशाहीन खेळ केला. सामन्याच्या 21व्या मिनिटाला जमशेदपूरने पहिली धोकादायक चाल केली आणि कॉर्नर फटका मिळविला. यावेळी आयतॉर मॉनरॉयने घेतलेला कॉर्नर गोलमध्ये जात असताना एफसी गोवाचा गोलरक्षक मोहम्मद नवाजने पंच केला.

या विजयाने एफसी गोवाला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचा हा तिसरा विजय आहे. आठ सामन्यांतून तीन विजय, दोन बरोबरी आणि तीन पराभवाने त्यांचे आता 11 गुण झाले आहेत. जमशेदपूर एफसीचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. त्यांचे आता आठ सामन्यांतून 10 गुण झाले आहेत. कालच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार एफसी गोवाच्या जॉर्गे ऑर्तिज मेंडोंझाला मिळाला. एफसी गोवाची पहिली चाल सामन्याच्या 27व्या मिनिटाला झाली. यावेळी जॉर्गे ऑर्तिज मेंडोंझाने दिलेल्या पासवर ब्रँडन फर्नांडिसचा फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला. 37व्या मिनिटाला जमशेदपूर एफसीने आघाडीचा गोल केला. मॉनरॉयने घेतलेल्या क्रिकीकवर बचावपटू स्टिफन इझेने नवाझला चकवित चेंडूला गोलमध्ये टाकले.

मध्यंतराला दोन मिनिटांचा अवधी असताना जमशेदपूर एफसीची आघाडी वाढविण्याची संधी थोडक्यात हुकले. यावेळी नेरीजूस वाल्सकीसने मारलेली फ्रिकीक गोलच्या आडव्या पट्टीला आदळून परत खेळात आली.

दुसऱया सत्राची सुरूवात जमशेदपूरने आक्रमक पद्धतीने केले यावेळी इसाक वानमालस्वामा आणि जॅकीचंद सिंगने रचलेल्या चालीवर अनिकेत जाधवचा शक्तिशाली फटका एफसी गोवाचा गोलरक्षक मोहम्मद नवाजने अडविला. 64व्या मिनिटाला एफसी गोवाने बरोबरीचा गोल केला. जमशेदपूरचा बचावपटू आलेक्सझांडर लिमाने एफसी गोवाच्या जेम्स डोनाचीला धोकादायक पद्धतीने पाडल्याबद्दल रेफ्रीने दिलेल्या पेनल्टीवर इगोर अँग्युलोने गोलरक्षक टी. पी. रेहेनेशला भेदले व बरोबरी साधली.

सामन्याच्या पूर्ण वेळेतील शेवटच्या मिनिटाला एफसी गोवा संघाची आघाडी घेण्याची संधी वाया गेली. यावेळी ब्रँडनने दिलेल्या पासवर सीमेनलेन डुंगल हेडरने चेंडूला गोलची दिशा दाखविण्यास चुकला. त्यापूर्वी जमशेदपूरच्या आलेक्सने नोंदविलेला गोल रेफ्रीने अवैद्य ठरविला.

ऐरव्ही चेंडूने गोललाईन क्रॉस केली होती. इंज्युरी वेळेत एदू बेदियाने घेतलेल्या कॉर्नरवर इगोरने हेडरवर विजयी गोल केला आणि संघाला तीन गुण मिळवून दिले.

Related Stories

युनूस खानकडून प्रशिक्षकपदाचा त्याग

Patil_p

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Tousif Mujawar

आयपीएलसाठी 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

Patil_p

युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा रद्द

Patil_p

एटीपीच्या मानांकनात मेदवेदेव्ह अग्रस्थानी

Patil_p

एएफसीच्या कोरोना व्हायरस मोहिमेत भुतियाचा समावेश

tarunbharat
error: Content is protected !!