Tarun Bharat

एफसी गोवाची प्ले-ऑफसाठी दावेदारी आता भक्कम

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आपले प्ले-ऑफचे स्थान अधिक मजबूत करताना एफसी गोवाने बेंगलोर एफसीचा 2-1 गोलोनी पराभव केला. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यातील विजयाने एफसी गोवाने तिसऱया स्थानावर झेप घेतली.

सामन्यातील सर्व गोल पहिल्या सत्रात झाले. एफसी गोवाचे गोल मशीन म्हणून संबोधला जाणारा स्पेनचा इगोर अँगुलो आणि रिदीम तलांगने प्रत्येकी एक गोल केला तर बेंगलोर एफसीच्या एकमेव गोलाची नोंद सुरेश वांगजामने केली. एफसी गोवाचा हा सलग दुसरा महत्वपूर्ण विजय ठरला.

त्याना या विजयाने तीन गुण प्राप्त झाले. 19 सामन्यांतून सात विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने त्यांचे आता 30 गुण झाले व ते आता तिसऱया स्थानावर आहेत. पराभवाने बेंगलोर एफसीचे 19 सामन्यांतून तीन विजय, दहा बरोबरी आणि सहा पराभवाने 19 गुण झाले व ते आठव्या स्थानावर आहेत.

पहिल्या सत्रात एफसी गोवाने आक्रमक खेळ केला आणि पहिल्या 23 मिनिटांतच दोन गोल करून भक्कम आघाडी घेतली. त्यानंतरच्या खेळावर मात्र बेंगलोर एफसी वर्चस्व आढळून आले. दुसऱया सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. सामन्याच्या आठव्याच मिनिटाला बेंगलोर एफसीने आपले पहिले धोकादायक आक्रमण केले. यावेळी पराग श्रीवासने दिलेल्या पासवर सुरेश वांगजामचा गोल करण्याचा यत्न हुकला.

एफसी गोव्याच्या आलेक्सझांडर रोमारियो जेसूराजची कालच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या ग्लेन मार्टिंन्स पासवर गोल करण्याची संधी हुकल्यानंतर 20 व्या मिनिटाला एफसी गोवाने गोल करून आघाडी घेतली. ग्लेन मार्टिंन्सच्या पासवर इगोर अँगुलोने बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूला भेदले आणि गोल नोंदविला. आघाडीनंतर तीनच मिनिटांनी एफसी गोवाने गोल केला आणि आघाडी घेतली. सॅरिटोन फर्नांडिसच्या पासवर जेसूराजने हाणलेला फटका प्रतिस्पर्धी बचावपटूला लागून परत आला. मिळालेल्या चेंडूला रिदीम तलांगने अचुक प्लेसमेंटवर गुरप्रीत सिंगला भेदले आणि एफसी गोवाचा दुसरा गोल केला. बेंगलोर एफसीने आपली पिछाडी 33व्या मिनिटाला एक गोलने कमी केली. क्लिटोन सिल्वाच्या पासवर सुरेश वांगजामने डाव्या बगलेतून मारलेल्या फटक्यावर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगला चकविले व गोल केला. त्यानंतर एफसी गोवाच्या इगोरचा जेसूराजच्या पासवर व नंतर बेंगलोर एफसीच्या क्लिटोन सिल्वाचे आशिक कुर्नियान व सिस्को हर्नांडिझच्या पासवर गाशल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले.दुसऱया सत्रात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला.

Related Stories

मुंडकार-कुळकार प्रकरणे वर्षभरात निकालात काढणार

Omkar B

काणकोणातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा

Omkar B

‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ ला सुवर्णमयुर

Amit Kulkarni

सक्षम ग्रामीण विकासावर भर देणारा यंदाचा अर्थसंकल्प

Patil_p

धेंपो स्पोर्ट्स क्लबची जर्सी कोविड वॉरियर्सना समर्पित

Omkar B

भाऊसाहेबांच्या शैक्षणिक धोरणाला भाजपा सरकारकडून हरताळ

Amit Kulkarni