Tarun Bharat

एफसी गोवाची लढत होणार ब्लास्टर्सशी

मडगाव : इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर केरळ ब्लास्टर्ससमोर एफसी गोवा संघाचे आव्हान असेल. सध्या एफसी गोवाचे 12 सामन्यांतील पाच विजय, चार बरोबरी आणि तीन पराभवाने 19 गुण झाले असून ते तिसऱया स्थानावर आहेत. 12 सामन्यांतील तीन विजय, चार बरोबरी आणि पाच पराभवाने 13 गुण झाले आहेत.

केरळ ब्लास्टर्सकरिता स्पर्धेचा दुसरा टप्पा चांगला ठरत आहे. स्पेनचे प्रशिक्षक किबू व्हिकुना यांच्या संघाने बेंगलोरविरुद्ध अखेरच्या क्षणी विजय खेचून आणला. त्यामुळे गेल्या तीन सामन्यांत त्यांनी सात गुणांची कमाई केली आहे. मागील 9 सामन्यांत त्यांना केवळ सहाच गुण मिळाले होते. एफसी गोवाविरूद्धची लढत मात्र सर्वांत खडतर असेल याची व्हिकुना यांना कल्पना आहे. आम्ही प्रत्येक सामन्यात अखेरपर्यंत चुरशीने खेळ करीत आहोत. गेल्या तीन सामन्यांत आम्ही चांगली झुंज दिली. आम्ही चांगला खेळ करून कमावले.  एफसी गोवाच्या रूपाने असा प्रतिस्पर्धी असेल, ज्याने चेंडूवरील ताब्यात वर्चस्व राखले आहे. एफसी गोवा पाच सामन्यांत अपराजित आहे. गोव्याविरुद्ध ब्लास्टर्सला 21 गोल पत्करावे लागले आहेत, जे चौथ्या आयएसएलपासून कोणत्याही संघाविरुद्धचे सर्वाधिक आहेत.एफसी गोवाविरुद्धचा सामना वेगळा असेल. चांगला खेळ करणाऱया चांगल्या संघाविरुद्ध आम्ही खेळू, पण खेळाडू सज्ज करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे व्हिकुना म्हणाले.

Related Stories

वायबंट मडगाव पॅनलच्या जया आमोणकर यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी गोवा भेटीवर

Amit Kulkarni

भूतखांब पठारावरील अनोखा दसरोत्सव..!

Patil_p

सत्तेत आल्यावर 250 दिवसांत खाण व्यवसाय सुरू करू

Amit Kulkarni

राज्यस्तरीय भजनी स्पर्धेत उसगाव श्री राम पुरुष आदिनाथ भजनी मंडळ प्रथम

Amit Kulkarni

हुतात्मा बाळा राया मापारी यांच्या कन्येचा जीवनमुक्त महाराज मठात गौरव

Amit Kulkarni
error: Content is protected !!