Tarun Bharat

‘एमआयडीसी’त मध्यप्रदेशातून 32 मजुरांची बस दाखल

पुष्कर कंपनीतील प्रकार,जिल्हा लॉकडाऊन असतानाही बस आलीच कशी

प्रतिनिधी/ खेड

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 8 जुलैपर्यंत जिल्हय़ात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही जिल्हय़ातून बाहेर जाण्याची व जिल्हय़ात येण्याची मुभा नाही. मात्र लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीत मध्यप्रदेशातून 32 मजुरांना घेऊन बस दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समजताच लोटेतील ग्रामस्थांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धडक देत व्यवस्थापनास जाब विचारला.

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन ‘बेक द चेन’साठी जिल्हाधिकाऱयांनी जिल्हय़ात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र शासनाचे आदेश पायदळी तुडवत मजुरांची बस पुष्कर कंपनीत दाखल झालीच कशी असा प्रश्न उपस्थित केला आहे. या बसमध्ये 32 मजुरांचा समावेश असून ही बस एम.आय.डी.सी.त आलीच कशी, मजुरांच्या आरोग्य तपासणीचे काय, या मजुरांना क्वारंटाईन करणार का, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर गोंधळलेल्या कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱयांनी थातूरमातूर उत्तरे देण्यास सुरूवात केली. अधिकाऱयांकडून मिळालेल्या उत्तराने समाधान न झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी थेट प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याकडे संपर्क साधत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱया कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कोणतीही परवानगी नसताना आलेल्या 32 मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

 याप्रसंगी लोटेचे माजी उपसरपंच रवींद्र गोवळकर, धामणदेवीचे उपसरपंच सचिन देवळेकर, प्रशांत दळी, माजी सरपंच पप्पू चाळके, लोटेचे उपसरपंच सचिन चाळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत गेल्या 8 दिवसांत 15 कोरोनाचे रूग्ण आढळले  असून नजीकचे ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. यातच मध्यप्रदेशातून आलेल्या 32 मजुरांमुळे ग्रामस्थांची भीती आणखीनच वाढली आहे. या मजुरांना कंपनीच्या एका सभागृहात ठेवण्यात आले असून या सर्व मजुरांची मध्यप्रदेश येथे आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

शृंगारतळी पुन्हा कोरोनाची एन्ट्री

Patil_p

गोव्यात सिंधुदुर्गातील रुग्णासाठी गोव्यातील युवकांचे रक्तदान

NIKHIL_N

सांगेली येथील तरुणाचा वीज पडून मृत्यू

Anuja Kudatarkar

कोकण संस्थेची विलवडे व शेर्ले येथील पूरग्रस्तांना मदत

Anuja Kudatarkar

‘कोविड’ सेंटर चालवताना प्रशासनापुढे समस्यांचा डोंगर

Patil_p

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत आजगांव प्राथमिक शाळा प्रथम

Anuja Kudatarkar