Tarun Bharat

एमआयडीसीत मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

प्रतिनिधी/ सातारा

सातारा एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीत मशीनवर काम करत असताना मशीनमध्ये अडकून बेशुध्द पडलेल्या कामगाराला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्या कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. उमेश मुगुटराव पवार (वय 55, रा. नलवडेवाडी, ता. कोरेगाव) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.

या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी सातारा एमआयडीसी परिसरात असलेल्या संग्राम इंटरप्रायजेस या कंपनीत उपस्थित कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी सेल मोल्डिंग मशीनवर काम करत असताना उमेश पवार हे मशीनमध्ये अडकून बेशुध्द पडले.

या घटनेवेळी उपस्थित कामगारांनी पवार यांना मशीन बाहेर काढले व तातडीने त्यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. मशीनमध्ये अडकून मृत्यू अशी या घटनेची नोंद झाली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

Related Stories

तारापूर एमआयडीसीतील कंपनी जळून खाक

datta jadhav

सातारा : महामार्गावर खड्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात

Archana Banage

पेरणी साधण्यासाठी कुरीचे ‘ जू ‘ तरुणांच्या खांद्यावर

Archana Banage

ठाकरे सरकारकडून लवकरच साडे बारा हजार पोलिसांची भरती

Tousif Mujawar

मुलाचा सडलेला मृतदेह 60 तास घरात

Patil_p

कोरोना ला हरवून टाकायचं हाय” चिमुकली सई घालतेय साद..

Patil_p